'या' लहानशा मुंबईकर मुलींनी केला विश्वविक्रम!


SHARE

विधी आणि सौम्या या दोन लहानग्या बहिणींनी सर्व मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामागचे कारणही तसेच आहे.

'बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटी बढाओ' आणि 'SaveWater' म्हणजेच पाणी वाचवा. हे संदेश देण्यासाठी या दोन बहिणींनी २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी विश्वविक्रम केला आहे.

या दोघींनी मुंबईच्या रस्त्यावर उतरून ऑपेरा हाऊस सिग्नलपासून ते गांधी स्मारक, एअर इंडिया बिल्डिंगपर्यंत स्केटिंगसोबत बास्केट बॉल ड्रीबल करत विश्वविक्रम केला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले. ९ वर्षांची सौम्या आणि ११ वर्षांची विधी या दोन्ही मुलींनी पाच किमीचं अंतर २९ मिनीट ३० सेकंदात पूर्ण केलं.

या विश्वविक्रमासाठी त्या दोघी गेल्या सहा महिन्यांपासून दररोज सकाळी चार वाजता उठून सराव करत होत्या.कशी झाली सुरुवात?

देशासाठी डझनावारी विक्रम करणारे शिक्षक ऋषी सरोदे यांनी १ मे २०१७ या दिवशी फिनिक्स मॉल येथे स्केटिंग करण्याचा एक विक्रम कायम केला.

हा विक्रम घडत असताना विधी आणि सौम्या अग्रवाल या दोघी या विक्रमाच्या प्रत्यक्ष साक्षीदार होत्या. त्याच क्षणी त्यांनी सरोदे यांचे मार्गदर्शन आणि शिष्यत्व मिळवण्याचा निश्चय केला. हे करत असताना भविष्यात आपणही विश्वविक्रम करू, हे त्या दोघींच्या ध्यानी-मनीही नव्हते. त्यांना केवळ ती कला आत्मसात करायची होती.


आईमुळे मिळाली विश्वविक्रमाची प्रेरणा!

या संपूर्ण प्रक्रियेत सर्वोत्तम क्षणांच्या तिसऱ्या साक्षीदार म्हणजे कांचन अग्रवाल. कांचन, ज्यांनी आपल्या दोन लहानग्या मुलींना भर पावसात सराव करण्यास प्रवृत्त केले आणि त्यांना मानसिक बळ देत राहिल्या. आपल्या मुलींचा सराव काटेकोरपणेच व्हावा यासाठी त्या सतत त्यांच्याकडे लक्ष देत राहिल्या. इतकेच नाही, तर आपल्या मुलींसोबत भरपावसात त्या देखील हजर राहिल्या. आता या सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळाले असल्याची भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली.


या दोघींनी या उपक्रमात उत्सुकता दाखवली. मला त्यांचा सपोर्ट मिळाला म्हणून आज हा विक्रम आम्ही पूर्ण करू शकलो. हा विक्रम पूर्ण करताना 'बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटी बढाओ'चा आम्ही संदेश दिला. भविष्यात देखील आम्ही वेगळे विक्रम करण्याचा प्रयत्न करू.

ऋषी सरोदे, प्रशिक्षक

हेही वाचा - 

'टूथब्रश'वर फुटबॉल फिरवून मोहनीशचा विश्वविक्रम

संबंधित विषय