SHARE

अतिशय थरारक रंगलेल्या सामन्यात ताजिकिस्तानचा ग्रँडमास्टर अॅमोनाटोव्ह फारुख याने नेदरलँड्सच्या प्रूजसर रोलँड याला बरोबरीत रोखत ८ गुणांनिशी ११व्या मुंबई महापौर अांतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. वांद्रे-कुर्ला संकुलातील माउंट लिटेरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या या स्पर्धेत फारुखने विजेतेपदासह ३.३ लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले तर दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागलेल्या नेदरलँड्सच्या रोलँडने २.३ रुपयांचे इनाम मिळवले.


२५ चालींमध्येच बरोबरी

विजेतेपदाचा फैसला लागणाऱ्या फारुख अाणि रोलँड यांच्यातील लढतीला पारंपरिक स्काॅच अोपनिंग पद्धतीने सुरुवात झाली. दोघांनीही ठरावीक अंतराने अापापल्या मोहऱ्यांची अदलाबदल केली. अखेरीस दोन्ही खेळाडूंचे हत्ती अाणि उंट शिल्लक राहिले असताना २५व्या चालीनंतर दोघांनीही बरोबरी पत्करण्याचे मान्य केले.


भारताचे हे बुद्धिबळपटू टाॅप-१० मध्ये

अनेक देशांच्या ग्रँडमास्टर्सचा समावेश असलेल्या या स्पर्धेत भारताच्या बुद्धिबळपटूंनीही चमक दाखवली. अांतरराष्ट्रीय मास्टर कार्तिक वेंकटरामन, ग्रँडमास्टर दिप्तयन घोष अाणि ग्रँडमास्टर दीपन चक्रवर्ती यांनी प्रत्येकी ७.५ गुणांची कमाई केली. पण सरस गुणांच्या अाधारे त्यांना अनुक्रमे सहाव्या, अाठव्या अाणि १०व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.


हेही वाचा -

कोल्हापूरच्या समीदचा ग्रँडमास्टर संदीपनला 'दे धक्का'

मुंबई महापौर बुद्धिबळ : दोन भारतीय बुद्धिबळपटू सहाव्या फेरीअखेर अाघाडीवरसंबंधित विषय
ताज्या बातम्या