Advertisement

मुंबई महापौर बुद्धिबळ : दोन भारतीय बुद्धिबळपटू सहाव्या फेरीअखेर अाघाडीवर


मुंबई महापौर बुद्धिबळ : दोन भारतीय बुद्धिबळपटू सहाव्या फेरीअखेर अाघाडीवर
SHARES

ईरिगैसी अर्जुन अाणि राजा रुत्विक अार. या दोन भारतीय फिडे मास्टरसह अन्य तीन ग्रँडमास्टर्सनी ३५ लाख रुपये बक्षिसे असलेल्या ११व्या मुंबई महापौर चषक अांतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या सहाव्या फेरीअखेर प्रत्येकी ४.५ गुणांसह अाघाडी घेतली अाहे. अव्वल मानांकित युक्रेनचा ग्रँडमास्टर क्रावस्तिव मार्टिन (एलो २६६२), व्हिएतनामचा ग्रँडमास्टर त्रान तुअान मिन्ह (एलो २५१४) अाणि ताजिकिस्तानचा ग्रँडमास्टर अॅमानोटोव्ह फारख हे पाच जण सध्या अाघाडीवर अाहेत.


समीद सेठेची उल्लेखनीय कामगिरी

वांद्रे-कुर्ला संकुलातील माउंट लिटेरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत कोल्हापूरच्या समीद जयकुमार सेठे याने ग्रँडमास्टर तुखाएव्ह अॅडम (एलो २५५७) याला बरोबरीत रोखण्याची करामत केली. स्पॅनिश पद्धतीने डावाची सुरुवात केल्यानंतर तुखाएव्ह अाणि समीद यांनी एकमेकांचे मोहरे टिपले. अखेर ४६व्या चालीनंतर दोघांनीही बरोबरी पत्करली.


रुत्विकची अव्वल खेळाडूशी बरोबरी

फिडे मास्टर रुत्विक राजा (एलो २२९६) याने स्पर्धेत अव्वल मानांकन मिळालेल्या क्रावस्तिव मार्टिन (एलो २६६२) याला बरोबरीत रोखण्यास भाग पाडले. कॅटलान अोपनिंगने सुरू झालेल्या या डावात मार्टिन काहीसा वरचढ स्थितीत होता. मात्र वजिरा-वजिरी झाल्यानंतर मार्टिनने तीन वेळा पटावर सारखीच परिस्थिती निर्माण केली. अखेर ४६व्या चालीनंतर हा सामना बरोबरीत सुटला.


हेही वाचा -

मुंबई महापौर बुद्धिबळ : राजा रुत्विकचा युक्रेनचा ग्रँडमास्टरला धक्का

'ज्युनियर तेंडुलकर'ची श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या U-19 संघात निवड

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा