Advertisement

मुंबईत टीएसजी बास्केटबाॅल स्कूलची स्थापना


मुंबईत टीएसजी बास्केटबाॅल स्कूलची स्थापना
SHARES

द स्पोर्टस गुरुकुलतर्फे अमेरिकेतील कोअर फोकस ट्रेनिंगच्या (सीएफटी) सहकार्याने मुंबईत टीएसजी बास्केटबाॅलची स्थापना करण्यात अाली अाहे. या स्कूलद्वारे होतकरू बास्केटबाॅलपटूंना प्राथमिक स्तरावर तसेच व्यावसायिक स्तरावर प्रशिक्षणाची संधी मिळणार अाहे. सीएफटीचे स्वत:चे प्रशिक्षक अापला अनुभव या मुलांसोबत शेअर करणार असून स्थानिक प्रशिक्षकांना मार्गदर्शनही करणार अाहे. टीएसजीच्या प्रशिक्षकांसोबत ते काम करणार असून येथील स्थानिक प्रशिक्षकांनाही अमेरिकन प्रशिक्षकांकडून या खेळाचे बारकावे अाणि प्रशिक्षणाचे तंत्र शिकण्याची संधी मिळेल.


भारतात बास्केटबाॅल या खेळाविषयी प्रचंड अावड अाहे. भारतात असलेले बाॅस्केटबाॅलचे असंख्य प्रशिक्षक हा त्याचा पुरावा अाहे. अमेरिकेतील कोअर फोकस ट्रेनिंगसोबत केलेल्या भागीदारीद्वारे अाम्ही फक्त भारतातील गुणवत्तेला चालना देण्यासाठी मदत करणार नसून त्यांना विकासाच्या मार्गावर अाणण्यासाठी प्रोत्साहन देणार अाहोत.
- परेश कोठारी, टीएसजीचे सहसंस्थापक


अमेरिकेत जाण्याची संधी

या अनेख्या कार्यक्रमाद्वारे तळागाळातील बास्केटबाॅलपटूंना अातंरराष्ट्रीय दर्जाची प्रशिक्षण पद्धतीचा लाभ उठवता येणार असून त्यांना अांतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी सज्ज केले जाईल. त्याचबरोबर स्काऊट्स या कार्यक्रमासाठी गुणवान बास्केटबाॅलपटूंची निवड करणार अाहे. निवडलेल्या खेळाडूंना अमेरिकेत जाऊन तेथील अकादमी अाणि क्लबमध्ये प्रशिक्षणाची संधी मिळणार अाहे.


हेही वाचा -

वर्ल्डकप कॅरममध्ये प्रशांत मोरे, काजल कुमारीची कमाल

माजी क्रिकेटपटूंनाही मिळणार एमसीएत मतदानाचा हक्क



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा