SHARE

पुण्यातील अाकुर्डी येथील श्रमशक्ती भवन येथे १ ते ९ सप्टेंबर २०१९ पासून रंगणाऱ्या महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत मुंबईतील कॅरमपटूंचा दबदबा पाहायला मिळणार अाहे. चारुशीला कुलकर्णी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त उत्कर्ष स्पोर्ट्स अकादमी अाणि कॅरम असोसिएशन अाॅफ पुणे यांच्या मान्यतेने ही स्पर्धा सुरू होत असून मुंबईच्या खेळाडूंनी अनुक्रमे महिला अाणि पुरुष गटात अव्वल मानांकन मिळवले अाहे. महिलांमध्ये सध्या फाॅर्मात असलेल्या काजल कुमारीला अव्वल मानांकन देण्यात अाले अाहे तर योगेश धोंगडे या मुंबईच्या कॅरमपटूनं पुरुषांमध्ये अव्वल मानांकन मिळवलं अाहे. या स्पर्धेत विजेत्यांना १ लाख १० हजार रुपयांची पारितोषिके अाणि चषक देऊन गौरविण्यात येणार अाहे.


योगेश धोंगडेला अव्वल मानांकन

पुरुषांमध्ये योगेश धोंगडेने अव्वल मानांकन मिळवले असून त्याखालोखाल मुंबईच्या मोहम्मद गुफरानचा क्रमांक लागतो. तिसऱ्या स्थानी पुण्याचा अनिल मुंढे तर मुंबईचे विकास धारिया अाणि प्रशांत मोरे व पंकज पवार अनुक्रमे चौथ्या, पाचव्या अाणि सहाव्या स्थानी अाहेत.


महिलांमध्ये मुंबईचा बोलबाला

अव्वल चार महिलांमध्ये मुंबईच्या खेळाडूंना मानांकन मिळाले अाहे. काजल कुमारी, मिताली पिंपळे अाणि संगीता चांदोकर व प्रीती खेडेकर यांनी अनुक्रमे पहिले, दुसरे, तिसरे अाणि चौथे मानांकन मिळवले अाहे. पाचव्या स्थानी रत्नागिरीची मैत्रेयी गोगटे व सहाव्या स्थानी मुंबईची नीलम घोडके अाहे.


हेही वाचा -

बार्सिलोना, युव्हेंट्सचे देव मुंबईत अवतरणार

मुंबई सिटी एफसी संघात बिपीन सिंगचा समावेश

ब्रेबाॅर्न स्टेडियममध्ये सौरउर्जा प्रकल्पाची उभारणी

मुंबईकर अभिषेक नायर पुद्दुचेरीकडून खेळणारसंबंधित विषय
ताज्या बातम्या