Advertisement

तुमच्याही डेबिट कार्डातला डेटा होऊ शकतो चोरी, अशी घ्या काळजी…


तुमच्याही डेबिट कार्डातला डेटा होऊ शकतो चोरी, अशी घ्या काळजी…
SHARES

सध्या कॅशलेसचा जमाना आहे. शॉपिंग सेंटर्स, सिनेमा, हॉटेल सगळीकडंच डेबिट, क्रेडिट कार्डांचा वापर होत असल्यानं आपलं कार्ड सुरक्षित हातात तर आहे ना? आपल्या कार्डाचं क्लोनिंग तर होत नाही ना? याची दक्षता घेण्याच्या सूचना क्रेडिट कार्ड टर्मिनल उत्पादक कंपनी ‘इन्जेनिको’नं दिल्या आहेत. एवढ्यावरच न थांबता बनावट कार्ड स्वाईप मशीन ओळखायची कशी? त्याच्या टीप्सही दिल्या आहेत. या टीप्स डेबिट, क्रेडिट कार्डाचा वापर करणाऱ्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाच्या ठरू शकतील.

हॉटेलात फॅमिली किंवा मित्रांसोबत जेवायला गेल्यावर बरेचजण बिल भरण्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरतात. वेटर समोर आल्यावर त्याच्याकडं बिनधास्तपणे कार्ड सोपवून गप्पा मारण्यात रंगून जातात. ही बेफिकरी बँक ग्राहकांसाठी आता धोक्याची ठरू लागलीय. काही दिवसांपूर्वी अंधेरी आणि वांद्र्यातील फाईव्हस्टार हॉटेलातील वेटर्सच्या टोळीनं ग्राहकांच्या डेबिट, क्रेडीट कार्डाचं क्लोनिंग करून त्यांच्या अकाऊंटमधून लाखो रुपये काढून घेतले होते. या प्रकरणी पोलीस तपास सुरूच आहे.

टेक्लॉनॉजी बरीच अडव्हांस झाल्यानं कार्डातून बँक ग्राहकाचा डेटा चोरणं आता खूपच सहज, सोपं झालं आहे. त्यासाठी हे अॅडव्हांस चोर ‘स्किमर मशीन’चा वापर करतात. ही मशीन हुबेहुब कार्ड स्वाईप मशीन सारखीच दिसते. या मशीनमध्ये कार्ड टाकताच, बँक ग्राहकाचा सगळा डेटा स्किमर मशीनमध्ये सेव्ह होतो. त्यानंतर हा डेटा काढून तो बँक ग्राहकाच्या बनावट कार्डात टाकला जातो. मग काय, हे चोरटे कुठल्याही बँकेच्या एटीएममध्ये जाऊन खात्यातील सगळे पैसे काढून घेतात किंवा कार्डाचा वापर करून वस्तू खरेदी करतात.


बनावट मशीन कशी ओळखाल?

  • बनावट स्वाईप मशीन (स्किमर) खऱ्या स्वाईप मशीनपेक्षा आकाराने मोठ्या  



  • खऱ्या स्वाईप मशीनमध्ये तुमचं क्रेडिट किंवा डेबिट कार्ड केवळ ६० टक्के आत जातं
  • बनावट मशीनमध्ये ते ९० टक्के आत जातं



  • बनावट स्वाईप मशीनवरील आकडे अस्पष्ट किंवा धुसर 
  • खऱ्या स्वाईप मशीनवरील सर्व आकडे ठळक



  • बनावट स्वाईप मशीनवरील हिरव्या रंगाची एलईडी लाईट बंद 
  • खऱ्या स्वाईप मशीनवरील हिरव्या रंगाची एलईडी लाईट कार्ड स्वाईप करताच पेटते



  • ग्राहकाला बिलावर सही करण्यासाठी खऱ्या मशीनवर पेन अडकवण्यासाठी क्लिप 
  • बनावट मशीनवर पेन अडकवण्याची क्लिप अत्यंत लहान किंवा नसते



चोरांनी आपल्या डेबिट, क्रेडिट कार्डाचा गैरवापर करू नये म्हणून काळजी घ्यायलाच हवी. खासकरून स्वाईप मशीनमध्ये पिन नंबर टाकताना सावधगिरी बाळगायला हवी. कार्ड कुणाकडेही सोपवू नये, संशयास्पद हालचालींवर नजर ठेवावी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या खात्यातून परस्पर पैसे काढल्याचं कळल्यावर त्वरीत बँकेशी संपर्क साधावा, जेणेकरून चोराचा ठावठिकाणा काढणं सोपं जाईल.
- रश्मी करंदीकर, प्रवक्त्या, मुंबई पोलीस


अशी घ्या काळाजी

  • लहानसहान खरेदीसाठी डेबिट, क्रेडिट कार्डाचा वापर टाळा
  • सुटे पैसे नेहमीच सोबत ठेवा
  • आपलं कार्ड कुठल्याही अनोळखी व्यक्तीच्या हातात देऊ नका
  • कुणीही आपलं कार्ड नजरेपासून दूर घेऊन जात असेल, तर त्याला रोखा
  • मशीन आपल्याजवळ घेऊन येण्यास सांगा
  • पिन नंबर कुणालाही सांगू नका
  • स्वाईप मशीनमध्ये पिन नंबर टाकताना तो एका हाताने झाकूनच टाका
  • ठराविक दिवसांनी पिन नंबर बदलत राहा
  • कार्ड स्वाईप करताना समोरच्या व्यक्तीच्या हालचालींवर नजर ठेवा
  • बँकेच्या ‘एसएमएस’ सेवेचा वापर करा. 
  • जेणेकरून कार्डाच्या अनपेक्षित वापराबद्दल चटकन तक्रार नोंदवता येईल
  • कार्डाद्वारे कॅश विड्रॉअलची लिमिट सेट करा, 
  • म्हणजे कितीही रक्कम तुमच्या खात्यात असली, तरी चोराला ठराविक लिमिटपेक्षा जास्त रक्कम एकाचवेळी काढता येणार नाही
  • कार्ड चोरीला गेल्यास त्वरीत बँकेला कळवून कार्ड ब्लॉक करा
  • काही बँका क्रेडिट कार्डाची चोरी झाल्यास, त्यातून परस्पर पैसे काढले गेल्यास त्यावर क्रेडिट कार्डधारकाला नुकसानभरपाईही देतात. अशा विम्याच्या सुविधांची माहिती घ्या


 


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा