Advertisement

मुंबई होणार वायफायमय


मुंबई होणार वायफायमय
SHARES

मुंबई - येत्या आठवड्यात मुंबईकरांना मोफत मिळणाऱ्या वायफाय सेवेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मुंबईकरांना महिन्याला मोफत 3 जीबी डेटापर्यंत वायफाय वापरता येणार आहे. मुंबईला स्मार्ट सिटी करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून यामुळे मुंबई वायफायमय होणार आहे. मुंबईतील नागरिक 3 जी, 4 जी, ब्रॉडबॅंड या इंटरनेट सेवा वापरत असल्या तरी मुंबईकर नागरिकांना हायस्पीड इंटरनेट सुविधा देणं हा या फ्री वायफाय सेवेमागचा उद्देश आहे. राज्य सरकारने संपूर्ण मुंबईत 1 हजार पाचशे हॉटस्पॉट बसवण्याचं योजिले आहे. त्यातील मुंबईतील काही भागात पहिल्या टप्प्यात पाचशे हॉटस्पॉट बसवण्यात आले आहेत. हे पाचशे हॉटस्पॉट बसवण्यासाठी अंदाजे 194 कोटी खर्च आला आहे. चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया, रेल्वे स्थानक परिसर आधी वर्दळीच्या ठिकाणी जास्तीत जास्त हॉटस्पॉट अॅक्सेस पॉईंट लावले आहेत. या ठिकाणी एकावेळी 20 ते 25 जण एका अॅक्सेस पॉईंटला कनेक्ट होऊ शकतील. एलएनटीच्या एमसीएस या कंपनीला हॉटस्पॉट बसवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. एचपी कंपनीचे 2 हजार एक्सेस पॉईंट आणि फोटीनेट कंपनीचे 600 अॅक्सेस पॉईंट लावण्यात आले आहेत. मंत्रालयाचा आरसा गेट, गार्डन गेट, गिरगाव चौपाटी आधी महत्त्वाच्या ठिकाणांसह सुमारे पाचशे हॉटस्पॉटची टेस्टींग करण्यात आली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा