Advertisement

गुगल झाले १९ वर्षांचे


गुगल झाले १९ वर्षांचे
SHARES

माहिती तंत्रज्ञान युगातील सर्वात बलशाली आणि लोकप्रिय सर्च इंजिन अशी जगभरातील युजर्समध्ये ख्याती मिळवलेले गुगल सर्च इंजिन १९ वर्षांचे झाले आहे.


काय खास?

गुगलने १९ वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करताना होमपेजवर डुडल स्पीनर गेम रचला आहे. या स्पीनरद्वारे मागील १९ वर्षांचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार स्पीनरमध्ये डुडलच्या आठवणीतील १९ गेम्सचा समावेश करण्यात आला आहे.


कुठले गेम?

यामध्ये हाॅलोविन गेम, स्नेक गेम, टिक टॅक टो, अर्थ डे क्विज, पॅक मॅन अशा गेम्सचा समावेश आहे. स्पीनर फिरवल्यानंतर या आठवणीतील कुठल्याही १९ गेम्सपैकी एक गेम आपल्याला खेळता येईल.


अशी झाली गुगलची स्थापना

सन १९९७ मध्ये गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन एकमेकांना स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीत भेटले. या भेटीदरम्यान त्यांनी जगातील इंटरनेट युजर्सना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नवे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे ठरवले. त्यातूनच गुगल सर्च इंजिनची निर्मिती झाली.

सद्यस्थितीत जगभरातील १६० देशांमधील ४.५ अब्ज वापरकर्ते आहे. गुगल कंपनी एका गॅरेजमध्ये बसून दोघांनी तयार केली होती. आज ही कंपनी म्हणजे डिजिटल युगाचे वट वृक्ष बनले आहे. भारतातील लाखो तरूणांना गुगलने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेण्यास प्रोत्साहन दिले आहे.

कल्पक विचार आणि नवीन तंत्रज्ञानच्या जोरावर डिजिटल युगात खंबीरपणे वाटचाल करणाऱ्या गुगलला 'मुंबई लाइव्ह'चा सलाम.



हेही वाचा -

पॅन कार्ड आधारशी लिंक केलंय? नसेल तर असं करा...



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)
 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा