इथं घ्या, भारतीय लष्कराच्या ‘वीरशक्ती’चं दर्शन

हाराष्ट्र सेवा संघाच्या सॅल्युट इंडिया उपक्रमातर्फे शुक्रवार १३ डिसेंबर ते रविवार १५ डिसेंबर २०१९ या कालावधीत मुलुंड (पूर्व) येथील वामनराव मुरांजन शाळेच्या शारदा नीलयम् संकुलात 'वीरशक्ती' हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे.

  • इथं घ्या, भारतीय लष्कराच्या ‘वीरशक्ती’चं दर्शन
SHARE

भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचं व युद्धसामग्रीचं सर्वसामान्यांना दर्शन घडावं, लष्कराचे कार्य व आव्हाने यांची जवळून ओळख व्हावी, तसंच शालेय मुलांना व युवावर्गाला लष्करातील विविध संधींची माहिती मिळावी या हेतूने महाराष्ट्र सेवा संघाच्या सॅल्युट इंडिया उपक्रमातर्फे शुक्रवार १३ डिसेंबर ते रविवार १५ डिसेंबर २०१९ या कालावधीत मुलुंड (पूर्व) येथील वामनराव मुरांजन शाळेच्या शारदा नीलयम् संकुलात 'वीरशक्ती' हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. भारतीय लष्कराच्या महाराष्ट्र, गोवा व गुजरात विभागाचे मुख्य अधिकारी लेफ्टनंट जनरल एस. के. प्राशर यांच्या हस्ते शुक्रवार १३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन निमंत्रितांच्या उपस्थितीत होणार आहे.

या प्रदर्शनस्थळी लष्करातील तोफा, बंदुकी, ग्रेनेडलाँचर, रडार तसंच रणगाडा यांचं जवळून दर्शन घेण्याची संधी शाळकरी मुले तसेच आबालवृद्धांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे लष्करातील आव्हानांविषयीची दृकश्राव्य सादरीकरणे (फिल्मशो), ड्रोनबाबतची कार्यशाळा, अडथळे पार करण्याच्या प्रात्यक्षिकांचा अनुभव (मर्यादित विद्यार्थ्यांसाठी) व लष्करी संधींविषयी प्रेरणादायी व्याख्याने असा भरगच्च कार्यक्रम प्रदर्शनस्थळी अनुभवता येणार आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवार १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रदर्शन संकुलातील सभागृहात प्रेरणा पुरस्कारांचा कार्यक्रम निमंत्रितांच्या उपस्थितीत होणार आहे. निवृत्त कर्नल सुधीर नाफड, कमांडो मधुसूदन सुर्वे व कमांडो संतोष राळे यांचा त्यांनी केलेले शौर्य व योगदान याबद्दल प्रेरणा पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. निवृत्त लेफ्टनंट जनरल के. टी. पारनाईक यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कारवितरणानंतर या तिघांचे रोमहर्षक अनुभव ऐकण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे. 

 

  • रविवार १५ डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात निवृत्त कर्नल सुधीर नाफड हे "अशा धडाडती तोफा" याविषयी सादरीकरण करणार आहेत. तसेच लष्कराचा युद्धसराव पाहण्याची संधी अभ्यागतांना मिळणार आहे. त्याची वेळ प्रदर्शनस्थळी घोषित करण्यात येणार आहे.  
  • शुक्रवार १३ डिसेंबर  स. १०.०० ते सायं. ५.३० व शनिवार १४ डिसेंबर स.  ८.३० ते सायं. ५.३० या दोन्ही दिवशी शालेय विद्यार्थ्यांना पूर्वनोंदणीने गटागटामध्ये प्रदर्शन पाहण्यास सोडण्यात येणार असून त्यासाठी शाळांनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. या दोन्ही दिवशी सायं. ५.३० ते रा. ८.३० या वेळेत प्रदर्शन सर्वसामान्य लोकांसाठी खुले असेल. रविवारी १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.०० वाजता या कार्यक्रमाची सांगीतिक सांगता होणार आहे.

या प्रदर्शनास भारतीय लष्कराचं सहकार्य मिळालं असून अधिकाधिक संख्येने सहभाग नोंदवून शाळा व नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असं आवाहन महाराष्ट्र सेवा संघातर्फे करण्यात आलं आहे. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या

YouTube व्हिडिओ