लोकलमध्येही वायफाय

  Mumbai
  लोकलमध्येही वायफाय
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबईतील रेल्वे स्टेशनवर मोफत वायफाय उपलब्ध करुन दिल्यानंतर रेल्वे प्रशासन प्रवाश्यांना आणखी खुश करण्याच्या तयारीत आहे. आता लोकल ट्रेन आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्येही वायफाय सेवा सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेवरील लोकलमध्ये हायस्पीड वायफाय उपलब्ध करण्यात येणार आहे. या साठी पंतप्रधान कार्यालया़कडून लक्ष घालण्यात येत आहे.

  2018 पर्यंत सर्व उपनगरी लोकल रेल्वेमध्ये वायफाय बसवण्यात येतील. पहिल्या टप्प्यात सर्व उपनगरी गाड्या आणि राजधानी, शताब्दी, दुरांतो सारख्या 100 लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्येही सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. वायफायचा स्पीड 45 mbps असेल, तर 30 मिनिटं इंटरनेट वापरल्यानंतर ब्राऊजिंगचा वेग कमी होईल. मुंबईतील प्रत्येक लोकलमधील अंदाजे 1200 प्रवासी एकाच वेळी हायस्पीड वायफाय वापरु शकतील. म्युझिक, व्हिडिओ, आयपीटीव्ही, गेम्स खेळण्याचा आनंद प्रवासी घेऊ शकतील. त्यामुळे लोकल प्रवाशांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.