Advertisement

मुंबई आयआयटीची गगनभरारी


मुंबई आयआयटीची गगनभरारी
SHARES

पवई - आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रथम या उपग्रहाचे श्रीहरीकोटा इथून 9 वाजून 12 मिनिटांनी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. प्रथम या उपग्रहामुळे विद्यूत परमाणू मोजता येणार आहेत. त्यामुळे जीपीएस प्रणाली आणखी सक्षम होणार आहे.

पीएसएलव्ही सी ३५ हे प्रक्षेपक आठ उपग्रहांसह अवकाशात झेपावले. आठ उपग्रहांमध्ये भारताचे तीन, अमेरिका आणि कॅनडाचे प्रत्येकी एक तर अल्जेरियाच्या आठ उपग्रहाचा समावेश आहे. भारताच्या तीन पैकी स्कॅटसॅट १ हा एक भारतीय उपग्रह असणार आहे. या उपग्रहाचे वजन ३७१ किलोग्रॅम असेल. या उपग्रहांमुळे सागरी तसेच हवामानसंबंधीच्या अभ्यासात मदत होणार आहे.

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांकडून ‘प्रथम’ची निर्मिती

विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान संशोधनात रस निर्माण व्हावा या उद्देशाने ‘इस्रो’ने विद्यार्थी उपग्रह योजना सुरू केली होती. आयआयटी मुंबईत शिकत असलेल्या सप्तर्षी बंडोपाध्याय आणि शशांक तामसकर या विद्यार्थ्यांनी 2007मध्ये या उपग्रहाची संकल्पना मांडली. यानंतर २००९मध्ये आयआयटी मुंबई आणि इस्रोमध्ये सामंजस्य करार झाला. या करारानुसार या उपग्रहाचे प्रक्षेपण २०१२मध्ये अपेक्षित होते. मात्र प्रशासकीय दिरंगाई आणि काही तांत्रिक अडचणींमुळे उपग्रहाचे प्रक्षेपण होऊ शकले नाही. तरीही या प्रकल्पावर विद्यार्थ्यांचे काम सुरू होतेच. या नऊ वर्षांच्या वाटचालीनंतर हा उपग्रह अवकाशात झेपावला. ‘प्रथम’ उपग्रहावर आतापर्यंत 30 विद्यार्थ्यांनी काम केले असून त्याच्यासाठी दीड कोटी रुपये खर्च आला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा