एकटेपणा वाटतोय, 'या' अॅपवर भाड्याने मिळवा बॉयफ्रेंड

तरुणाईत नैराश्याचं वाढत असलेलं प्रमाण लक्षात घेऊन हे अॅप तयार करण्यात आलं आहे. नैराश्यामुळे एकटेपणाची भावना सतावते. अशावेळी त्यांना मन मोकळं करण्यासाठी एखादा चांगला मित्र किंवा मैत्रीण मिळावी या उद्देशाने हे अॅप तयार करण्यात आलं आहे.

SHARE

शहरांमधील धावपळीच्या आयुष्यात तरुणांच्या जीवनशैलीचं समीकरण पूर्णपणे बदललं आहे. अनेक तरुण-तरुणी नोकरीच्या निमित्ताने घरापासून लांब रहायला जातात. अशात कामाचा ताण आणि घरापासून दूर राहत असल्यानं येणारा एकटेपणा यातून अनेकदा तरुणांना नैराश्याचा सामना करावा लागतो. मात्र आता तुम्हाला निराश होण्याची गरज नाही. कारण चक्क बॉयफ्रेंड भाड्यावर मिळू शकतात. होय विश्वास बसत नाहीये ना! पण हे सत्य आहे.


RABF अॅप

मुंबई आणि पुणे या शहरांत एकटे राहात असाल तर पैसे खर्चून बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड मिळवणं शक्य होणार आहे. 'रेंट अ बॉयफ्रेन्ड टू क्युअर डिप्रेशन' (RABF) या मोबाइल अॅपवर बॉयफ्रेंड मिळवता येऊ शकेल. हे अॅप १५ ऑगस्टला लाँच झालं आहे.


नैराश्यावर उपाय

तरुणाईत नैराश्याचं वाढत असलेलं प्रमाण लक्षात घेऊन हे अॅप तयार करण्यात आलं आहे. नैराश्यामुळे एकटेपणाची भावना सतावते. अशावेळी त्यांना मन मोकळं करण्यासाठी एखादा चांगला मित्र किंवा मैत्रीण मिळावी या उद्देशाने हे अॅप तयार करण्यात आलं आहे.


इतके पैसे भरा 

यामध्ये जर सेलिब्रिटी हवा असल्यास तासाला ३ हजार रुपये, मॉडेलसाठी २ हजार आणि सामान्य व्यक्ती हवा असल्यास तासाला ३०० ते ४०० रुपये मोजावं लागणार आहे. तर यामध्ये टोलफ्री क्रमांकाची सुविधाही देण्यात आली असून फोनवर १५ ते २० मिनिटापर्यंत संवाद साधाण्यासाठी ५०० रुपये भरावे लागतील.

कौशल प्रकाश या २९ वर्षाच्या तरुणाने हे अॅप तयार केलं आहे. नैराश्याचा सामना करणाऱ्या वक्तींचा गमावलेला आत्मविश्वास पुन्हा कमावण्यास या अॅपमुळे नक्कीच मदत होऊ शकेल, असं कौशलचं म्हणणं आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या