Advertisement

नागरिकांसाठी आरटीओचं नवं अॅप


नागरिकांसाठी आरटीओचं नवं अॅप
SHARES

सध्याच्या काळात सर्वत्रच डिजीटल मीडियाचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच आता परिवहन विभाग देखील डिजीटल मीडियामध्ये पाय रोवत आहे. नुकतीच काही दिवसांपूर्वी ताडदेव परिवहन कार्यालयात ई-चलन सेवा सुरू करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना रांगा लावण्यापासून मुक्तता मिळाली होती. दिवसेंदिवस शहरात मोठ्या प्रमाणात गाड्यांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीकरता परिवहन विभागातर्फे 'आरटीओ महाराष्ट्र' नावाचे अॅप लॉन्च करण्यात आले आहे.

यामध्ये प्रवाशांसाठी सार्वजनिक सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रवास करताना आपत्कालीन परिस्थितीमध्ये अडचणीत असलेल्या प्रवाशांना त्यांच्या नातेवाईकांना संदेश (एसएमएस) पाठवण्याची सुविधादेखील त्यात उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अॅपचा उपयोग हा अपघात प्रसंगीसुद्धा करण्यात येऊ शकतो. विशेष म्हणजे टॅक्सी किंवा रिक्षा इतर वाहनांची तक्रार देखील आपण सहजरित्या करू शकतो. अशा प्रकारे या अॅपची रचना करण्यात आली आहे. हे अॅप गुगलवर मोफत उपलब्ध करून दिलं आहे.



हेही वाचा

स्कूलबसमधल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा