Advertisement

ट्विटर पॉलिसीत बदल, आता मोजावे लागणार पैसे

ट्विटरचा कार्यभार सांभाळताच एलन मस्क यांनी ट्विटरच्या पॉलिसीत बदल करायला सुरुवात केली आहे.

ट्विटर पॉलिसीत बदल, आता मोजावे लागणार पैसे
SHARES

एलन मस्क (Elon Musk) ट्विटर (Twitter) चे नवीन बॉस होताच ट्विटर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ट्विटर ब्‍लू टिक (Twitter Blue Tick) साठी आता मंथली चार्ज वसुलीवर जास्त चर्चा सुरू झाली आहे.

एलन मस्क यांनी स्पष्ट केले आहे की, ट्विटर प्लॅटफॉर्मला फ्री चालवले जाणार नाही. ट्विटर ब्लू टिक (Twitter Blue Tick) साठी दर महिना ८ डॉलर म्हणजचे जवळपास ६६० रुपये वसूल केले जाणार आहेत.

एलन मस्क (Elon Musk) ने स्पष्ट केले आहे की, देशात ट्विटर ब्लू टिक (Twitter Blue tick Charge) चा चार्ज वेगवेगळा असणार आहे. कोणत्या देशात किती चार्ज वसूल करायचा आहे हे खरेदी पॉवरवर अवलंबून असेल. भारतात ट्विटर ब्लू टिकसाठी ६६० रुपये मंथली चार्ज द्यावा लागणार आहे. एलन मस्क यांनी एका ट्विट मध्ये म्हटले की, ट्विटर ब्लू टिक देण्याची सध्याची सिस्टम व्यवस्थित नाही.

एलन मस्क यांनी सांगितले की, पेड ब्लू टिक यूजर्सला रिप्लाय, सर्च आणि मेंशन मध्ये प्राथमिकता दिली जाईल. याशिवाय, ट्विटरवर मोठे व्हिडिओ आणि ऑडियो पोस्ट केले जावू शकतील. ट्विटर ब्लू टिक यूजर्सला आधीच्या तुलनेत कमी जाहिराती दिसतील.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा