Advertisement

तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअ‍ॅप डाऊन, ट्विटरवर युजर्सच्या तक्रारी

व्हॉट्सअ‍ॅपकडून अद्याप अधिकृत माहिती नाही.

तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअ‍ॅप डाऊन, ट्विटरवर युजर्सच्या तक्रारी
SHARES

Whatsapp Down in India: जगभरात कोट्यवधी युजर्स असणारं व्हॉट्सअ‍ॅप भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास डाऊन झालं. त्यामुळे जगभरातील युजर्स ट्विटरवर येऊन यासंदर्भात ट्वीट्स करू लागले आहेत. काही तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्याचं सांगितलं जात आहे.

आधी काही काळ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मेसेजेस पाठवता येत नव्हते. मात्र, काही वेळानंतर पर्सनल चॅटदेखील बंद झाले आहेत. आत्तापर्यंत हजारो युजर्सनी ही समस्या येत असल्याचं ट्विटरवर सांगितलं आहे.

दरम्यान, गेल्या अर्ध्या तासापासून व्हॉट्सअ‍ॅपच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यासंदर्भात व्हॉट्सअ‍ॅपकडून अद्याप अधिकृत माहिती दिली नसल्यामुळे हा बिघाड नेमका कधीपर्यंत दुरुस्त होईल? याबाबत नेटिझन्स ट्विटरवर विचारणा करू लागले आहेत.

Downdetector ने दिलेल्या माहितीनुसार, 69 टक्के युजर्सना मेसेज करण्यात अडचणींना सामोरे जावे लागले. तर, 21 टक्के युजर्सकडून इंटरनेट कनेक्शनबाबत समस्या जाणवत होती. तर, 9 टक्के युजर्सना इतर समस्या जाणवत होत्या. सुरुवातीला, व्हॉट्सअॅपमधील ग्रुपमध्ये मेसेजचे आदान-प्रदान करण्यात युजर्सना अडचणी जाणवत होत्या. त्यानंतर वैयक्तिक मेसेजही पाठवण्यास अडचणी येऊ लागल्या.

अनेकजण मेसेजिंग, महत्त्वाच्या फाईल्स ट्रान्सफर करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करतात. व्हॉट्सअॅप हा अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग झाला आहे. व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याने कोट्यवधी युजर्सचा त्याचा फटका बसला आहे.

सोशल मीडियावर युजर्सकडून तक्रारींचा पाऊस पडू लागला. काही वेळेत ट्वीटरवर #WhatsAppDown चा ट्रेंड सुरू झाला. व्हॉट्सअॅपची मालकी असणाऱ्या मेटा कंपनीकडून याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आली नाही. 



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा