Advertisement

आयफोन युझर्सच्या व्हाॅट्सअॅपवर लवकरच डार्क मोड

आयफोन निर्माता कंपनी अॅपलनं (apple) टेस्टफ्लाइटवर व्हॉट्सअ‍ॅपची (whats app) नवीन बीटा व्हर्जन सादर केली आहे.

आयफोन युझर्सच्या व्हाॅट्सअॅपवर लवकरच डार्क मोड
SHARES

आयफोन (iphone) युझर्ससाठी एक चांगली बातमी आहे. आयफोनवर लवकरच डार्क मोड हे फिचर येणार आहे. त्यामुळे डार्क मोड (Dark Mode)ची प्रतिक्षा अखेर संपणार आहे. आयफोन निर्माता कंपनी अॅपलनं (Apple) टेस्टफ्लाइटवर व्हॉट्सअ‍ॅपची (whats app) नवीन बीटा व्हर्जन सादर केली आहे. ही माहिती व्हॉट्सअॅपशी संबंधित नवीन अपडेट्सबाबत माहिती देणाऱ्या WABetaInfo च्या अहवालातून समोर आली आहे.


अपडेट करावं लागेल

टेस्टफ्लाइट हे अॅपलचं स्वतःचा बीटा चाचणी प्लॅटफॉर्म आहे. आयफोनवरील व्हॉट्सअ‍ॅप बीटा युझर्सना टेस्टफ्लाइट वरून 2.20.30.25 बीटा वर्जन मिळवण्यासाठी अॅपला अपडेट करावं लागेल. त्यानंतर त्यांना डार्क मोड अपडेट उपलब्ध होईल. IOS युझर्ससाठी व्हॉट्सअॅप बिझनेस बीटा 2.20.30.16 आधीपासूनच डार्क मोडला सपोर्ट करते. अॅन्ड्रॉईड बीटासाठी डार्क मोड आधीपासूनच उपलब्ध आहे.


IOS १३लाच करणार सपोर्ट

आयओएस बीटा युझर्स व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन डार्क मोर्ड अॅक्टिव्ह करू शकतात. सेटिंग्जमध्ये गेल्यावर चॅट्स या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर थीममध्ये जाऊन डार्क मोड हे फिचर तुम्ही अॅक्टिव्ह करू शकता. आयफोन डार्क मोडसाठी व्हॉट्सअॅप आयओएस 13 एपीआय या वर्जनचा वापर करत आहे. म्हणून याहून कमी iOS वर्जनवर डार्क मोड उपलब्ध होणार नाही.


डार्क मोड सर्वत्र लागू

आयओएस बीटामध्ये डार्क मोड आयएएस बीटा, डार्क चॅट लिस्ट, डार्क बबल, डार्क वॉलपेपरवर उपलब्ध असेल. बबल्स एंड टू एंड एन्क्रिप्शन दर्शवतात आणि त्यात पिवळा मजकूर पाहायला मिळेल. याशिवाय स्टेटस सेटिग्ज देखील आपोआपच डार्क मोडमध्ये दिसेल.



हेही वाचा

मुलांनो TikTok वर होताय 'आऊट ऑफ कंट्रोल', आता पालक करणार कंट्रोल

कॅब चुकिच्या मार्गानं घेऊन जात असेल तर Google देणार वॉर्निंग

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा