'इथं' पाहा 'चांद्रयान २'चं लाइव्ह लँडिंग

१.५५ वाजता भारताचं मून लँडर 'विक्रम' चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरल्याचं लाइव्ह टेलिकास्ट दुरदर्शन चॅनलवर पाहता येणार आहे. याशिवाय खाली दिलेल्या लिंकवर देखील तुम्ही लाइव्ह टेलिकास्ट पाहू शकता.

  • 'इथं' पाहा 'चांद्रयान २'चं लाइव्ह लँडिंग
SHARE

भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. ७ सप्टेंबरला पहाटे १.५५ वाजता भारताचं मून लँडर 'विक्रम' चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. 'विक्रम' चंद्राच्या पृष्टभागावर उतरल्यानंतरच खरं मिशन सुरू होईल असं इस्रोनं म्हटलं आहे. इस्रोचं पहिले अध्यक्ष विक्रम साराभाई यांच्या नावावरून मून लॅंडरला 'विक्रम' नाव देण्यात आलं आहे.चांद्रयानचा आणखी एक महत्त्वपूर्ण भाग हा 'प्रग्यान' रोव्हर आहे. सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर हे रोव्हर चंद्रावर 500 मीटरपर्यंत फिरणार आहे. या रोव्हरला सहा चाकं असतील. चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणं हे या रोव्हरचं काम असेल असं इस्रोनं आपल्या व्हिडिओत म्हटलं आहे.

कुठे पाहाल लाइव्ह चांद्रयान २?

इस्रोच्या माहितीनुसार शनिवारी पहाटे १.३० ते २.३० च्या सुमारास चांद्रयान-२ विक्रम लॅडर चंद्राला स्पर्श करेल. भारताचं मून लँडर 'विक्रम' चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरल्याचं लाइव्ह टेलिकास्ट दुरदर्शन चॅनलवर पाहता येणार आहे. याशिवाय खाली दिलेल्या लिंकवर देखील तुम्ही लाइव्ह टेलिकास्ट पाहू शकता.

याशिवाय स्टार प्लस, नॅशनल जॉग्रफिक या चॅनलवर ६ सप्टेंबरला रात्री ११ वाजल्यापासून चांद्रयान-२ वर स्पेशल कार्यक्रम पाहू शकता. यात चांद्रयान-२ संंदर्भात सखोल माहिती मिळेल. 

  • फेसबुकवर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://www.facebook.com/ISRO/

  • ट्विटरवर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://twitter.com/isro

  • इस्त्रोच्या वेबसाईटवर पाहण्यासाटी खालील लिंकवर क्लिक करा.

https://www.isro.gov.in/

 

चांद्रयानाचा प्रवास

२२ जुलैपासून या चांद्रयानाचा प्रवास सुरू झाला. चांद्रयान २ यान पृथ्वीच्या कक्षेबाहेर गेलं आहे. २० ऑगस्टपर्यंत चांद्रयान २ चंद्राच्या कक्षेत पोहोचलं. सध्या हे यान पृथ्वी ते चंद्र या टप्प्यात आहे, असंही इस्रोतर्फे सांगण्यात आलं आहे. २२ जुलैपासून १४ ऑगस्टपर्यंत चांद्रयान-२ पृथ्वीच्या कक्षेत ठेवण्यात आलं होतं. चांद्रयानानं पृथ्वीच्या कक्षेत अनेक फेऱ्या मारल्यानंतर हळूहळू चंद्राच्या दिशेनं रवाना झालं आहे. चांद्रयान २ हळूहळू पृथ्वीपासून दूर जातं आहे आणि चंद्राच्या जवळ जातं आहे. १४ ऑगस्टला रात्री २ वाजता चांद्रयान २ ला एक जोरदार धक्का देण्यात आला आहे. ज्यामुळे चांद्रयान २ चं रॉकेट प्रज्वलित झालं.'चांद्रयान-२' संदर्भात जाणून घ्या '९' रंजक गोष्टी


संबंधित विषय
ताज्या बातम्या