Advertisement

'चांद्रयान-२' संदर्भात जाणून घ्या '९' रंजक गोष्टी

चांद्रयान-1 ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन म्हणजेच इस्रोनं इतिहास रचला. याचाच दुसरा टप्पा इस्रो २२ जुलै २०१९ ला म्हणजेच आज सुरू करणार आहे. आज आम्ही तुम्हाला चांद्रयान-२ संदर्भात काही रंजक गोष्टी सांगणार आहोत.

'चांद्रयान-२' संदर्भात जाणून घ्या '९' रंजक गोष्टी
SHARES

'चांद्रयान-१' ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन म्हणजेच इस्रोनं इतिहास रचला. याचाच दुसरा टप्पा इस्रो २२ जुलै २०१९ ला म्हणजेच आज सुरू करणार आहे. भारताचं 'चांद्रयान-२' हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. चंद्राच्या विषुववृत्तीय प्रदेशामध्ये आतापर्यंत चांद्रयानं उतरली आहेत.

चंद्राचा विषुववृत्तीय प्रदेश इतर भागाच्या तुलनेत थोडा सपाट आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुव मात्र दऱ्या-खोऱ्यांचा आणि खडबडीत पृष्ठाचा आहे. त्यामुळे इतर कोणत्याही देशानं आजवर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाण्याचं धाडस केलेलं नाही. या 'चांद्रयान-२' मोहिमेचा मुख्य उद्देश आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करून त्यातून एक रोव्हर चंद्राच्या पृष्ठावर सोडणं.

'चांद्रयान-२' संदर्भात असा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या अनेकांना माहित नाहीत. आज आम्ही तुम्हाला 'चांद्रयान-२' संदर्भात काही रंजक गोष्टी सांगणार आहोत.

) 'चांद्रयान' या मोहिमेचा हा दुसरा टप्पा आहे. या मोहिमेत चंद्राचा पृष्ठभाग, चंद्राचा गाभा आणि बाह्य वातावरणाचा अभ्यास करून चंद्रावरील पाण्याचे मूळ शोधून काढण्याचा प्रयत्न केला जाईल.

) चंद्राच्या पृष्ठावर सॉफ्ट लँडिंग करणारा, त्याच्या भूरचनेचा, अंतर्गत गर्भाचा आणि वातावरणाचा अभ्यास करणारा भारत चौथा देश झाला आहे. यापूर्वी ही कामगिरी सोव्हिएत युनियन, अमेरिका आणि चीन यांनी केली आहे.

) 'चांद्रयान-१'च्या यशानंतर ११ वर्षानंतर 'चांद्रयान-२' चं प्रक्षेपण करण्यात येत आहे. 'चांद्रयान-२' साठी ९७८ कोटी रुपये  इतका खर्च करण्यात आला आहे.

) 'चांद्रयान-२' ला चंद्रावर पोहोचायला ५४ दिवस लागणार आहे.

) चंद्रावरचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवरच्या १४ दिवसांएवढा लांब असतो.

) चांद्रयानाचे तीन भाग असतील. यामध्ये ऑर्बिटर, लँडर आणि सहाचाकी रोव्हरचा समावेश आहे. या सर्व भागांची निर्मिती भारतानं केली आहे. भुवनेश्वरच्या सेंट्रल टूल रूम अॅण्ड ट्रेनिंग सेंटरमध्ये याची निर्मिती करण्यात आली आहे.

) लँडरचं नाव विक्रम असं ठेवण्यात आलं आहेभारतीय अंतराळ मोहिमेचे जनक मानले जाणारे डॉ. विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आलं आहे.

) GSLV MK-III हे लाँचर ६४० टन वजनाचं आहे. भारतानं आजवर तयार केलेलं सर्वांत जास्त वजनदार लाँचर आहे. हे लाँचर ३ हजार ८९० किलो वजनाचं 'चांद्रयान-2' घेऊन जाईल. या यानामध्ये १३ वैज्ञानिक उपकरणं आहेत. या १३ उपकरणांमध्ये १ उपकरण नासाचं आहे.

) चंद्रावर अशोक चक्र आणि इस्रोचे चिन्ह उमटवून चांद्रयान परतणार आहे. रोव्हरच्या एका चाकावर अशोकचक्र आणि दुसऱ्यावर इस्रोचं चिन्ह आहे. त्यामुळे रोव्हर उतरल्यानंतर त्यांची प्रतिमा चंद्रावर उमटेल.

) आजवर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा अभ्यास झालेला नाही. चांद्रयान यशस्वीरीत्या चंद्रावर उतरलं तर भारत हा दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरेल.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement