Advertisement

तब्बल २ तास ठप्प झाल्यानंतर सुरू झालं You Tube

भारतासोबत अमेरिका, आशिया, युरोपसह जगभरात 'यू ट्युब' ठप्प झालं होतं. 'यू ट्युब' उघडताच स्क्रीनवर Error 503 Internal Server Issues असा मेसेज येत होता. 'यू ट्युब' बंद झाल्यानंतर जवळपास अर्धा तास युजर्सला नेमकं काय झालं हे कळत नव्हतं.

तब्बल २ तास ठप्प झाल्यानंतर सुरू झालं You Tube
SHARES

आॅनलाइन व्हिडिओ बघणाऱ्या युजर्सची सर्वात लोकप्रिय वेबसाईट 'यू ट्युब' बुधवारी सकाळी तब्बल २ तास ठप्प झाली होती. यामुळे जगभरातील युजर्सच्या काळजाचे ठोके चुकले होते. भारतात सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास ठप्प झालेलं 'यू ट्युब' २ तासांनंतर सुरू झाल्यावर कुठे युजर्सच्या जीवात जीव आला.


अडचण कुठली?

भारतासोबत अमेरिका, आशिया, युरोपसह जगभरात 'यू ट्युब' ठप्प झालं होतं. 'यू ट्युब' उघडताच स्क्रीनवर Error 503 Internal Server Issues असा मेसेज येत होता. 'यू ट्युब' बंद झाल्यानंतर जवळपास अर्धा तास युजर्सला नेमकं काय झालं हे कळत नव्हतं. डेस्कटॉप तसंच मोबाइल अशा दोन्ही ठिकाणी 'यू ट्युब' वापरताना अडचणी येत होत्या. अनेकांनी 'यू ट्युब'वर लॉगइन करण्याचा, व्हिडिओ अपलोड करण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु युजर्सला लाॅगइन करता येत नव्हतं.आधीही असाच प्रकार

त्यामुळे सगळीकडेच गोंधळाचं वातावरण होतं. कारण गेल्या महिन्यातसुद्धा काही तांत्रिक कारणामुळे युजर्सना लॉग इन करण्यास अडचणी येत होत्या. परंतु ही समस्या तात्काळ सोडवण्यात आली होती.


समस्येवर मात

त्यानंतर जगभरातील युजर्सनी सोशल मीडियावर या समस्येची माहिती देत स्क्रीन शाॅट शेअर केले. त्यावर 'यू ट्युब'ने ट्विटरवरून उत्तर देत तांत्रिक समस्येवर काम सुरू असून लवकरात लवकर 'यू ट्युब' सुरू होईल असं सांगितलं. त्यानंतर २ तासांनंतर तांत्रिक समस्येवर मात करत 'यू ट्युब'ने ही सेवा पूर्ववत केली. मात्र 'यू ट्युब' ठप्प होण्यामागचं कारण अद्याप अस्पष्टच आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement