Advertisement

छत्तीसगडच्या अनुपा दास 'कौन बनेगा करोडपती १२'च्या तिसऱ्या करोडपती ठरल्या

छत्तीसगडच्या अनुपा दास 'कौन बनेगा करोडपती १२' च्या तिस-या करोडपती ठरल्या आहेत.

छत्तीसगडच्या अनुपा दास 'कौन बनेगा करोडपती १२'च्या तिसऱ्या करोडपती ठरल्या
SHARES

छत्तीसगडच्या अनुपा दास 'कौन बनेगा करोडपती १२' च्या तिस-या करोडपती ठरल्या आहेत. शोमध्ये भाग घेण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती. मात्र त्या पहिल्या सीझनपासून या शोमध्ये येण्याचा प्रयत्न करीत होत्या. बारा वर्षे दीर्घ प्रतीक्षा केल्यानंतर त्यांना यश आलं.

अनुपा दास जिंकलेला पैसा त्यांच्या कर्करोग झालेल्या आईच्या उपचारांसाठी वापरणार आहे. त्या तिस-या स्टेजच्या कर्करोगाशी लढा देत आहेत. अनुपा दास म्हणाल्या की, सध्या, मी आणि माझे कुटुंब कठीण परिस्थितीतून जात आहोत, कारण आमचा बहुतांश पैसा रुग्णालयात खर्च झाला आहे. आता, माझ्या जवळ जे काही आहे ते त्यांचेच आहे. मी या शोमध्ये जे काही कमावले आहे ते मी माझ्या कुटुंबाला देईल. देवाच्या कृपेने, आमच्याकडे आमच्या आईला सर्वोत्कृष्ट उपचार देण्यासाठी पैसे आले आहेत.

शेवटच्या प्रश्नात अनुपा दास यांना दोन खेळाडूंबद्दल विचारले गेले होते की, ते कोणत्या संघाचे आहेत. पण त्यांना उत्तर माहित नव्हते. त्यामुळे त्यांनी चुकिचं उत्तर देऊन धोका पत्करण्याची जोखीम घेतली नाही. म्हणून त्यांनी शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. शोमध्ये जे काही मिळवलं त्यावर त्या खूप समाधानी आहेत. अनुपा दास यांच्या कुटुंबात आई-वडील, दोन लहान बहिणी आहेत. दोघीही विवाहित असून त्यांना मुलं आहेत.हेही वाचा

भूमी पेंडणेकरच्या 'दुर्गामती' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

दिशा सालियन आत्महत्या प्रकरण : खटला सीबीआयकडे सोपवण्यास न्यायालयाचा नकार

संबंधित विषय
Advertisement