Advertisement

डान्स दिवाने ३ मध्ये माधुरीच्या जागी सोनू सूदची वर्णी, वाचा यामागील कारण

‘डान्स दिवाने 3’ या शोमध्ये लवकरच अभिनेता सोनू सूद झळकणार आहे.

डान्स दिवाने ३ मध्ये माधुरीच्या जागी सोनू सूदची वर्णी, वाचा यामागील कारण
SHARES

‘डान्स दिवाने 3’ या शोमध्ये लवकरच अभिनेता सोनू सूद झळकणार आहे. परीक्षक म्हणून तो या शोमध्ये येत आहे. येत्या काही दिवसांसाठी माधुरी या शोमधून ब्रेक घेत आहे. त्यामुळे तिचे थोडे दुखी आहेत.

सध्या कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईमधील सर्व शुटींग बंद ठेवण्यात आल्या आहेत. आणि म्हणूनचं काही दिवस डान्स दिवानेचं शूट बेंगलोरमध्ये पार पडणार आहे. मात्र माधुरी दीक्षितनं बेंगलोरला जाण्यास नकार दिला आहे.

त्यामुळे येत्या काही भागांमध्ये ती दिसणार नाही. तसंच काही भागांसाठी माधुरीच्या जागी अभिनेता सोनू सूदची वर्णी लागली आहे. यामध्ये नोरा फतेहीसुद्धा परीक्षकाच्या भूमिकेत दिसून येत आहे.

डान्सिंग रिएलिटी शो ‘डान्स दिवाने 3’ (Dance diwane 3) सध्या खुपचं चर्चेत आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. काहीदिवसांपूर्वी सेटवर एकाच वेळी १८ जणांना कोरोनाची लागण झाल्यानं हाहाकार माजला होता. त्यांनतर कार्यक्रमातील दुसरा परीक्षक धर्मेश येलांडे यालासुद्धा कोरोनाची लागण झाली होती.

धर्मेश नंतर होस्ट राघव जुयाल यालासुद्धा कोरोनाची लागण झाली होती. आता अशी माहिती समोर येत आहे की, येत्या चार भागांमध्ये माधुरी दीक्षित सुद्धा कार्यक्रमात दिसणार नाही. माधुरीनं हा कार्यक्रम सोडलेला नाही किंवा तिला रिप्लेसही केलेलं नाही. मात्र ती चार आठवड्यांसाठी नसणार आहे.हेही वाचा

मालदीवला फिरायला जाणाऱ्या कलाकारांवर भडकला नवाजुद्दीन

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा