Advertisement

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील 'या' कलाकाराचं निधन

'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेतही काम करून त्यांनी प्रेक्षकांची मन जिंकली.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील 'या' कलाकाराचं निधन
SHARES

‘अमिता का अमित’, ‘श्रीगणेश’ यांसारख्या मालिका आणि ‘हंसी तो फसी’, ‘मन’ या चित्रपटांत भूमिका साकारणारे अभिनेते जगेश मुकाटी यांचे निधन झालं. १० जून रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ४७ वर्षांचे होते. त्यांना दीर्घ काळापासून अस्थमाचा आजारा होता. ते गेल्या चार दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. बुधवारी त्यांना श्वास घेताना खूप त्रास जाणवला. अखेर बुधवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली निधनानं कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

जगेश मुकाटी यांनी अनेक हिंदी आणि गुजराती मालिकांमध्ये काम केलं. 'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेतही काम करून त्यांनी प्रेक्षकांची मन जिंकली. ‘अमिता का अमित’, ‘श्रीगणेश’, कसम से यांसारख्या मालिका आणि ‘हसी तो फसी’, ‘मन’ या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील अभिनेत्री अंबिका रांजणकरनं यांनी सोशल मीडियावर जगेश यांच्यासोबतचा फोटो शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. जगेश यांच्या अकाली जाण्यानं गुजराती आणि हिंदी मालिका आणि कलाक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याचा शोक व्यक्त केला आहे.



जगेश यांचे बालपणीचे मित्र आणि अनेक गुजराती नाटकांमध्ये काम करणारे संजय गोराडिया यांनी एका चॅनलला दिलेल्या माहितीत म्हटलं की,  जगेश यांना चार दिवसांपूर्वी श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारदरम्यान त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अचानक आलेल्या अस्थमाच्या अटॅकमुळे त्यांची प्राणज्योत मालवली.

गेल्या काही वर्षांत जगेश यांचे वजन सातत्यानं वाढत असल्याचं बोललं जातं होतं. त्यांचे वजन १५० किलो झाले होते. अनेक मित्रांनी त्यांना लठ्ठपणा कमी करण्यासाठी सर्जरी करण्याचाही सल्ला दिला होता, पण त्यांनी तो ऐकला नव्हता.

गेल्या काही दिवसांमध्ये कलाक्षेत्रात अनेक कलाकलांच्या निधनानं पोकळी निर्माण झाली आहे. इरफान खान, ऋषी कपूर, संगीतकार वाजिद खान, दिग्दर्शक बासु चॅटर्जी यांच्यासारखे अनेक दिग्गजांनी जगाचा निरोप घेतल्यानं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.



हेही वाचा

सुशांत सिंह राजपूतच्या एक्स मॅनेजरची आत्महत्या

बॉलिवूड येतंय रुळावर, विकी कौशल करतोय 'या' सिनेमाचं शुटींग

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा