Advertisement

बॉलिवूड येतंय रुळावर, विकी कौशल करतोय 'या' सिनेमाचं शुटींग

उरी फेम अभिनेता विकी कौशलनं शूटिंगला सोमवारपासून सुरुवात केली आहे.

बॉलिवूड येतंय रुळावर, विकी कौशल करतोय 'या' सिनेमाचं शुटींग
SHARES

काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं शूटिंगला सुरुवात केल्याचे फोटो आणि व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाले. फोटोत अक्षय कुमार एका शॉर्ट फिल्मच्या शूटिंगसाठी पूर्णपणे काळजी घेताना दिसला. आता बॉलिवूडमधले इतर स्टार देखील शूटिंगला सुरुवात करत आहेत. त्यापैकी एक स्टार आहे विकी कौशल.

बॉलीवूड अनलॉक झाल्याची चाहूल लागताच उरी फेम अभिनेता विकी कौशलनं शूटिंगला सोमवारपासून सुरुवात केली आहे. इन्स्टाग्रामवरील पोस्टवर त्यानं सोमवारपासून उधमसिंग चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करत असल्याचं म्हटलं आहे. त्यानं या चित्रपटाचं पोस्ट प्रोडक्शन ८ जून पासून सुरु होत असल्याचं होतं. म्हणजेच विक्की कामावर सोमवारपासून परतला आहे.

विक्कीनं बॉलीवूड अनलॉकची माहिती एखादी कविता लिहावी तशी दिली आहे. तो लिहितो,

‘जब प्रकृतीने इशारा किया, हमने सुना, तेज भागते हुये हमने स्लो मोशनमे आनेके लिये गिअर बदले, अब फिरसे एक बार बुलावा आया है, एक उत्साह है, लेकिन सावधानी के साथ सब कुछ फिरसे शुरू करनेकी भूख. इस भावनाके साथ शुरू करते है, फिर से, कल से सरदार उघमसिंग.

उधमसिंग हा चित्रपट २ ऑक्टोबरला रिलीज होणार होता मात्र लॉकडाऊन मुळे काम बंद करावं लागल्यानं तो आता १५ जानेवारी २०२१ मध्ये रिलीज होणार आहे. जालियनवाला बाग नरसंहार घटनेवर तो आधारित आहे. १३ एप्रिल १९१९ मध्ये जालियनवाला बागेत जो अमानुष गोळीबार झाला त्याचा उधमसिंग हे प्रत्यक्ष साक्षीदार होते. २१ वर्षानंतर त्यांनी या अन्यायाचा बदला घेताना १३ मार्च १९४० ला पंजाब गव्हर्नर मायकेल ओ एवायर यांचा लंडन मध्ये गोळी घालून जीव घेतला. त्याबद्दल उधमसिंग याना ३१ जुलै १९४० रोजी फाशी दिली गेली होती.

दरम्यान कोरोनामुळे सुमारे ७० दिवसांचा लॉक डाऊन लागू करण्यात आला होता. आता त्यातून अंशत: सूट देण्यात आली आहे. २० मार्च पासून बंद झालेली चित्रपट, टीव्ही मालिका शुटींग आता सरकारच्या सर्व अटी पाळून पुन्हा सुरु होऊ लागली आहेत.



हेही वाचा

आईच्या मृतदेहाजवळ खेळणारा 'तो' चिमुकला, आता जबाबदारी उचलणार मीर फाऊंडेशन

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह, कुटुंबही...

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा