Advertisement

'दादा एक गुड न्यूज आहे'देणार सोन्याची राखी!

मराठी रंगभूमीवरील नाटकांमध्ये नेहमीच नात्यांचा गोतावळा पहायला आहे. सध्या 'दादा एक गुड न्यूज आहे' हे नाटक रसिकांचं मनोरंजन करत आहे. बहिण-भावाच्या नात्यावर आधारित असलेल्या या नाटकासोबत रक्षाबंधन सेलिब्रेट करण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

'दादा एक गुड न्यूज आहे'देणार सोन्याची राखी!
SHARES

मराठी रंगभूमीवरील नाटकांमध्ये नेहमीच नात्यांचा गोतावळा पहायला आहे. सध्या 'दादा एक गुड न्यूज आहे' हे नाटक रसिकांचं मनोरंजन करत आहे. बहिण-भावाच्या नात्यावर आधारित असलेल्या या नाटकासोबत रक्षाबंधन सेलिब्रेट करण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.


शतकमहोत्सवी प्रयोग

बहीण-भावाच्या सुंदर नात्याचे नाजूक बंध उलगडणाऱ्या सोनल प्रॉडक्शन निर्मित 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे. अल्पावधीतच या नाटकानं प्रेक्षकांना आपलेसं केलं आहे. भावा-बहिणीचं नातं हे नेहमीच खास असतं. या नात्यात कधी भांडणं, तर कधी थट्टामस्करी असते, कधी रुसवे-फुगवे, तर कधी अबोलाही असतो... या सगळ्यामागे असतं ते फक्त निःस्वार्थ प्रेम. भावा-बहिणेचं हे अतूट नातं अधिक समृद्ध करण्यासाठी आणि  'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाच्या शतकमहोत्सवी प्रयोगानिमित्तानं रक्षाबंधनच्या दिवशी एका अनोख्या सेलिब्रेशनचं आयोजन करण्यात आलं आहे. 


सोन्याची राखी भेट 

रक्षाबंधन या सणाचं औचित्य साधत १५ ऑगस्टला ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे दुपारी ४. ३० वाजता 'दादा एक गुड न्यूज आहे' हे नाटक बघायला जाताना, आपला भावा-बहिणीसोबतचा एखादा सुंदर फोटो सोबत घेऊन जा, त्याच्यामागं तुमची एखादी एकमेकांसोबतची खास आठवण लिहा आणि प्रयोगाआधी तो ड्रॉपबॉक्समध्ये टाका. प्रयोगाच्या शेवटी तीन विजेत्या भाऊ-बहिणींना सोन्याची राखी भेट म्हणून देण्यात येणार आहे. त्यामुळं 'दादा एक गुड न्यूज आहे'च्या पुढाकारानं आयोजिलेल्या या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होऊन, यंदाचं रक्षाबंधन अधिकच खास आणि अविस्मरणीय बनवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. 

 पुरस्कारांवर मोहोर

या नाटकात उमेश कामत आणि हृता दुर्गुळे यांनी भाऊ-बहिणीची भूमिका साकारली आहे. उमेशची पत्नी प्रिया बापटची प्रस्तुती असलेल्या या नाटकाचं दिग्दर्शन अद्वैत दादरकरनं केलं आहे. 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकानं आजवर बऱ्याच पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे. इतकंच नाही तर सिंगापूरवासियांनाही या नाटकानं भुरळ पाडली आहे. भावा-बहिणीच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या या नाटकाचं लेखन कल्याणी पाठारे यांनी केलं असून, उमेश आणि हृता यांच्या जोडीला आरती मोरे, ऋषी मनोहर या कलाकारांच्याही या नाटकात भूमिका आहेत.हेही वाचा -

ऋतिक-टागयरमध्ये होणार 'वॅार'

'तेजाज्ञा'ची सणासुदीसाठी खास भेट

आता बस्स… बस्स…
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा