पृथ्वी थिएटरची चाळीशी!

पृथ्वीची ४० वी वर्षपूर्ती मोठ्या दिमाखात आणि आगळ्यावेगळ्या शैलीत साजरी केली जाणार आहेत. पृथ्वी थिएटरतर्फे ३ थिएटर्समधील - पृथ्वी थिएटर, रॉयल ऑपेरा हाऊस आणि जी५ ए येथील - परफॉर्मन्सच्या महोत्सवाने साजरी केली जाणार आहेत.

SHARE

भारतीय कला क्षेत्रातील अनमोल क्षणांचा साक्षीदार असलेलं आयकॅानिक पृथ्वी थिएटर ४० वर्षांचं झालं आहे. आजवर अनेक दिग्गजांचा परफॅार्मन्स अनुभवणारं हे थिएटर भारतातीलच नव्हे, तर जगभरातील कलाकार आणि कलाप्रेमींचं श्रद्धास्थान. इथे परफॅार्म करण्याची संधी मिळावी यासाठी स्थिरस्थावर झालेले बडेही कलाकार धडपडतात, पण भाग्यवंतांनाच पृथ्वीच्या मंचावर आपली कला सादर करण्याची संधी मिळते. त्यामुळेच ज्यांना पृथ्वीमध्ये काम करण्याची संधी मिळाली ते ही गोष्ट जीवनभर मोठ्या अभिमानाने सांगतात.


धूमधडाक्यात साजरा

पृथ्वीची ४० वी वर्षपूर्ती मोठ्या दिमाखात आणि आगळ्यावेगळ्या शैलीत साजरी केली जाणार आहेत. पृथ्वी थिएटरतर्फे ३ थिएटर्समधील - पृथ्वी थिएटर, रॉयल ऑपेरा हाऊस आणि जी५ ए येथील - परफॉर्मन्सच्या महोत्सवाने साजरी केली जाणार आहेत. पृथ्वीराज कपूर यांच्या वाढदिवशी त्यांचं ‘दीवार’ हे नाटक रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये पुन्हा एकदा सादर केलं जाणार आहे. हे नाटक पहिल्यांदा याच नाट्यगृहात सादर झालं होतं.


पृथ्वी फेस्टीव्हल’ला सुरुवात

५ नोव्हेंबर १९७८ रोजी पृथ्वी थिएटरमधील रंगभूमीनं आपलं पहिलं नाटक पाहिलं... ते होतं ओम पुरी आणि नसीरुद्दीन शाह यांच्या अभिनयानं नटलेलं मज्मा यांचं ‘उद्ध्वस्त धर्मशाला’. आता, नसरुद्दीन शहा अभिनित मोटले यांच्या ‘द ट्रूथ’ या नाटकाने ५ नोव्हेंबर रोजी पृथ्वी थिएटरमध्ये ‘पृथ्वी फेस्टिव्हल’ला सुरुवात होणार आहे. नेहमीप्रमाणेच पृथ्वी थिएटर आपल्या प्रेक्षकांना संस्मरणीय अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहे.


गतकाळातील आठवणी

यंदाच्या महोत्सवात प्रेक्षक गतकाळातील वैभवाच्या आठवणींसोबत काहीशा आधुनिक, समकालीनतेची जोड दिलेला नाट्यानुभव घेऊ शकतील. महोत्सवाचा हा प्रवास पुढे जाऊन शेवटच्या दिवशी एनसीपीएच्या एसओआयतर्फे पृथ्वी थिएटरमध्ये सादर होणाऱ्या ग्रँड फिनालेपर्यंतचा असेल. हा महोत्सव ३ नोव्हेंबर २०१८ रोजी रॉयल आपेरा हाऊसमध्ये सुरू होईल. त्यानंतर ५ ते १२ नोव्हेंबर २०१८ दरम्यान पृथ्वी थिएटरमध्ये विविध नाट्यप्रयोग रंगतील.हेही वाचा-

‘रिंगण’ने पटकावले ५ फिल्मफेअर पुरस्कार

‘मोठी तिची सावली’ अशीच राहू दे- मीना मंगेशकर-खडीकर


 

संबंधित विषय
ताज्या बातम्या

YouTube व्हिडिओ