रेल्वे स्थानकांत महिन्यात ९.५० लाख जीबी डेटा वापर

मुंबईच्या २८ रेल्वे स्थानकांवरील फुकट वायफायचा पुरेपूर वापर करत जून महिन्यात तब्बल ९.५० लाख जीबी डेटा प्रवाशांकडून वापरण्यात अाला अाहे.

SHARE

सर्वच मोबाईल कंपन्या स्वस्तात इंटरनेट देत असल्या तरी फुकट इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या कमी नाही. मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर मिळत असलेल्या फुकट वायफाय इंटरनेटचा वापर करण्यास प्रवाशांनी कसलीही कसर सोडली नाही.  मुंबईच्या २८ रेल्वे स्थानकांवरील फुकट वायफायचा पुरेपूर वापर करत जून महिन्यात तब्बल ९.५० लाख जीबी डेटा प्रवाशांकडून वापरण्यात अाला अाहे. म्हणजे रोज सरासरी ३० हजार जीबी डेटाचा वापर करण्यात अाला.


कल्याणमधे सर्वाधिक डेटा वापर

या २८ रेल्वे स्थानकांवर हायस्पीड गुगल वायफाय सेवा आहे. त्यापैकी कल्याण रेल्वे स्थानकावर सर्वाधिक डेटा वापरण्यात आला. जून महिन्यात ४ लाख २२ हजार १४९ प्रवाशांनी कल्याण स्थानकात गुगल वायफाय वापरण्यासाठी लॉग इन केले.  म्हणजे रोज सरासरी १४ हजार प्रवाशी या स्थानकात फुकट डेटा वापरत अाहेत.  कल्याणनंतर ठाणे स्थानकात या मोफत वायफायचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या रोज सरासरी १३ हजार अाहे.


अंधेरी स्टेशनही आघाडीवर

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी रेल्वे स्थानकावरुन रोज जवळपास ११ हजार प्रवासी मोफत वायफाय मिळवण्यासाठी गुगल लॉग इन करतात. सर्वाधिक वायफाय इंटरनेट डेटा वापरणाऱ्या टॉप १० स्थानकांमध्ये मध्य रेल्वेची ६ आणि पश्चिम रेल्वेची ४ स्थानकं अाहेत. प्रत्येक प्रवासी ३५० एमबीपेक्षा जास्त इंटरनेट वापरत असल्याचं दिसून येत अाहे. ठाणे, सीएसएमटी, कुर्ला, दादर, बोरीवली, वांद्रे, डोंबिवली या स्थानकात सर्वाधिक वायफाय वापरण्यात येत असल्याचं मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आलं. हेही वाचा -

घाटकोपर मेट्रो स्थानकावर राडा, धक्काबुक्कीविरोधात प्रवाशाची तक्रार

प्रवासी आरक्षण केंद्र 2 ऑगस्टला तात्पुरते बंद
संबंधित विषय
ताज्या बातम्या