Advertisement

मध्य रेल्वेवरील ईएमयू सेवेला ९५ वर्षे पूर्ण

मध्य रेल्वेत ईएमयू सेवेला ९५ वर्षे ३ फेब्रूवारी २०२० रोजी पूर्ण झाली आहेत.

मध्य रेल्वेवरील ईएमयू सेवेला ९५ वर्षे पूर्ण
SHARES

मध्य रेल्वेत ईएमयू सेवेला ९५ वर्षे ३ फेब्रूवारी २०२० रोजी पूर्ण झाली आहेत. मुंबईच्या तत्कालीन राज्यपाल सर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते ४ कारसह प्रथम ईएमयू सेवेचा शुभारंभ ३ फेब्रूवारी १९२५ रोजी झाला होता. पहिली सेवा तत्कालीन बॉम्बे व्हीटी (सीएमएमटी) ते हार्बर मार्गावरील कुर्ला स्थानकापर्यंत चालविण्यात आली होती. या ईएमयू सेवेला मध्य रेल्वेत ९५ वर्ष पूर्ण झाल्यानं मुंबई विभागातील निवृत्त कर्मचारी वीणाधरन पी. टी. यांनी केक कापत हिरवा झेंडा दाखवला.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(सीएसएमटी) स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर हा कार्यक्रम पार पडला. त्याशिवाय, एक ईएमयु पत्रक ही प्रकाशित करण्यात आलं. अतिरिक्त महाव्यवस्थापक आणि प्रधान मुख्य विद्युत अभियंता एस.पी. वावरे, प्रधान मुख्य यांत्रिकी अभियंता ए.के. गुप्ता, मुख्य विद्युत लोकोमोटीव्ह अभियंता अनूप अग्रवाल, मुख्य विद्युत सेवा अभियंता मनोज महाजन, मुख्य विद्युत अभियंता (रोलिंग स्टॉक) व्ही. के. मेहरा, मुख्य विद्युत अभियंता (जनरल) ए.के. तिवारी, मुख्य मोटिव पॉवर अभियंता संजीव देशपांडे, मुख्य रोलिंग स्टॉक इंजीनियर (कोचिंग) रूपेश कोहली, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पीयूष कक्कर आणि एच जी तिवारी, मुंबई विभाग तसंच मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यावेळी उपस्थित होते.

ईएमयू प्रकाराविषयी काही तपशील

  • वर्ष               ईएमयू प्रकार
  • १९२५ - हार्बर मार्गावर ४-कार(डब्बे)
  • १९२७ – मध्य रेल्वे मार्ग आणि हार्बर मार्गावरील ८-कार (डब्बे)
  • १९६१ – मध्य रेल्वे मार्गावर ९-कार (डब्बे)
  • १९८६ – मध्य रेल्वे मार्गावर १२-कार(डब्बे)
  • १९८७ - कर्जतच्या दिशेने १२-कार(डब्बे)
  • २००८ - कसा-याच्या दिशेने १२- कार (डब्बे)
  • २०१० - ट्रान्सहार्बर लाइनवर १२-कार (डब्बे)
  • २०१२ - मुख्य मार्गावरील १५-कार (डब्बे)
  • २०१६ - हार्बर मार्गावर १२-कार (डब्बे)
  • २०२० - ट्रान्सहार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल.



हेही वाचा -

मुंबईकर रोहितची वनडे-कसोटीतून माघार, भारतीय संघाला मोठा धक्का

रंग बदलणारा सरडा कोण? शेलारांनीच आधी आत्मपरिक्षण करावं- उदय सामंत



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा