Advertisement

एसी लोकलच्या 'इतक्या' फेऱ्या वाढणार

पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे.

एसी लोकलच्या 'इतक्या' फेऱ्या वाढणार
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता पश्चिम रेल्वेनं एसी लोकलच्या ८ अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरपासून या अतिरीक्त फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. याबाबत पश्चिम रेल्वेनं अहवाल तयार केला आहे.

फेऱ्यांचा प्रस्ताव

प्राथमिक अहवालानुसार, ८ पैकी, सकाळी आणि संध्याकाळी, गर्दीच्या वेळी प्रत्येकी १ फेरी चालवण्यात येणार आहे. उर्वरित ६ फेऱ्या दुपारच्या वेळेत चालवण्यात येणार आहेत. पुढच्या २ आठवड्यांमध्ये अतिरिक्त वातानुकूलित फेऱ्यांचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. तसंच, चर्चगेट ते विरारदरम्यान या फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

अतिरिक्त फेऱ्या

चर्चगेट ते वांद्रेदरम्यान या अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा प्रस्ताव विभागीय कार्यालयानं तयार केला होता. मात्र, तांत्रिक कारणास्तव तो रखडला आहे. सद्यस्थितीत पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात ४ वातानुकूलित लोकल आहेत. यापैकी एका लोकलची देखभाल-दुरुस्ती सुरू असून अन्य २ लोकलच्या चाचण्या सुरू आहेत. उर्वरित एक लोकल पश्चिम रेल्वेवर धावत आहेत.



हेही वाचा -

मुंबईकरांसाठी जानेवारीत दाखल होणार पहिले रो-रो जहाज

अक्षयचा नवा रेकॉर्ड, चित्रपटातून वर्षाला ७०० कोटींची कमाई



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा