Advertisement

'सीएसएमटी' स्थानक परिसराच्या पुनर्विकासाला मिळणार गती

२००८ पासून हाती घेतलेल्या या प्रकल्पाला आता गती देण्याचं काम होत असल्याची माहिती समोर येत आहे.

'सीएसएमटी' स्थानक परिसराच्या पुनर्विकासाला मिळणार गती
SHARES

मुंबईतील सीएसएमटी स्थानक व परिसराचा विमानतळाच्या धर्तीवर पुनर्विकास केला जाणार आहे. जागतिक वारसा लाभलेल्या या स्थानक व परिसराचे काम करण्यासाठी काही अडचणी होत्या. त्यामुळं त्यांची मंजुरी आणि अन्यप्रक्रियांमध्ये बराच वेळ गेला. मात्र, २००८ पासून हाती घेतलेल्या या प्रकल्पाला आता गती देण्याचं काम होत असल्याची माहिती समोर येत आहे.

सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर या स्थानकाचं काम केलं जाणार आहे. त्यासाठी निविदा मागवण्यात आली असून याबाबत प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. सीएसएमटी स्थानक व परिसरातील मोकळ्या जागांमध्ये केला जाणारा विकास प्रवासी व पर्यटकांच्या सुविधा लक्षात ठेवून केला जाणार आहे.

गॅलरी, कॅफे टेरिया, वाहनतळासाठी जागा अशा अनेक सुविधा दिल्या जाणार असून, त्याचा आराखडा तयार आहे. सीएसएमटी स्थानकाला लागूनच मागील बाजूस असलेल्या रेल्वेच्या अ‍ॅनेक्स इमारतीसमोरील टॅक्सीसाठीचा वाहनतळ हटविण्यात येणार आहे. तसंच, याठिकाणी प्रवाशांसाठी मोकळी जागा व बसण्यासाठी आसनव्यवस्था केली जाणार आहे.

जवळच असलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचं तिकीट केंद्र स्थलांतरीत करून इमारतीचा काही भाग पाडला जाणार आहे. त्याऐवजी परिसरात समोरील सीएसएमटी स्थानकाची भव्य वास्तू पाहण्यासाठी हॅरिटेज गॅलरी उभारली जाणार आहे. जेणेकरून येणारे प्रवासी किंवा पर्यटक गॅलरीत उभे राहून समोरील ऐतिहासिक सीएसएमटी स्थानक पाहू शकतील.

फलाट क्रमांक १८ च्या दिशेनं प्रवेश केल्यानंतर कॅफे टेरिया, प्रवाशांना बसण्याची जागा, यार्डाचे नुतनीकरण, स्थानक परिसरात वाहनतळासाठी मोकळी जागा उपलब्ध केली जाणार आहे.



हेही वाचा -

'आम्ही आणू बाप्पा तुमच्या घरी', मनसेचा अनोखा उपक्रम

अटल रँकिंगमध्ये आयआयटी मुंबई देशात दुसऱ्या स्थानी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा