Advertisement

डोन्ट वरी! 'मालाड, गोरेगावहून सुटणाऱ्या लोकल जोगेश्वरीला थांबणार'


डोन्ट वरी! 'मालाड, गोरेगावहून सुटणाऱ्या लोकल जोगेश्वरीला थांबणार'
SHARES

मालाड-गोरेगावहून सुटणाऱ्या सर्व लोकल जोगेश्वरीला थांबविण्यात येतील, असे आश्‍वासन पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांनी राज्यमंत्री तसेच जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रवींद्र वायकर यांना दिले आहे. यामुळे जोगेश्वरी स्थानकातील प्रवाशांनी आता चिंता करण्याची गरज नाही.


तातडीची बैठक

मालाड, गोरेगावहून सुटणाऱ्या लोकल १ ऑक्टोबरपासून जोगेश्वरी स्थानकात न थांबविण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला होता. या विरोधात जोगेश्वरीतील प्रवाशांमध्ये असंतोष पसरला. त्याची दखल घेत राज्यमंत्री वायकर यांनी ४ ऑक्टोबर रोजी आपल्या मंत्रालयीन दालनात बैठक बोलावली. या बैठकीला खा. अरविंद सावंत, नगरसेवक बाळा नर, विभागीय रेल्वे व्यवस्थापक जैन, सुहानी मिश्रा आदी अधिकारी उपस्थित होते.



विश्वासात न घेताच निर्णय कसा?

खासदार, आमदार तसेच नगरसेवक यांना विश्वासात न घेता रेल्वेने हा निर्णय कसा घेतला? असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला. येथील प्रवाशांनी अथवा जनतेने अशी मागणी केली होती का? असा प्रश्‍न राज्यमंत्री वायकर यांनी उपस्थित केला.


अखेर नमते

मालाड, गोरेगावहून सुटणाऱ्या लोकल न थांबविण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतल्याने जोगेश्‍वरीतील प्रवाशांचे ऐन गर्दीच्या वेळी प्रचंड हाल होत असल्याने जोगेश्वरी स्थानकावर गाड्या पुन्हा थांबविण्यात याव्यात, असे वायकर यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना सांगितले. त्यांची ही मागणी मान्य करीत विभागीय रेल्वे व्यवस्थापक जैन यांनी मालाड, गोरेगावहून सुटणाऱ्या सर्व लोकल पुन्हा थांबविण्यात येतील, असे आश्वासन दिले.



हेही वाचा -

मुंबईला मिळणार ६० नव्या 'लोकल'



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा