Advertisement

आंबिवली पादचारी पूल वेळेआधीच होणार खुला?

आंबिवली पुलाचं काम जवळपास पूर्ण झालं असून हा पूल मुदतीपूर्वीच म्हणजेच ३१ जानेवारीआधीच प्रवाशांना वापरासाठी खुला करण्यात येण्याची शक्यता रेल्वे सूत्रांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना व्यक्त केली आहे.

आंबिवली पादचारी पूल वेळेआधीच होणार खुला?
SHARES

एल्फिन्स्टन पूल चेंगराचेंगरीनंतर मुंबईतल्या तीन पादचारी पुलांचं बांधकाम लष्कराकडून करण्यात येत आहे. यामध्ये एल्फिन्स्टन, करी रोड आणि आंबिवली येथील पादचारी पुलांचा समावेश आहे. यातल्या आंबिवली पुलाचं काम जवळपास पूर्ण झालं असून हा पूल मुदतीपूर्वीच म्हणजेच ३१ जानेवारीआधीच प्रवाशांना वापरासाठी खुला करण्यात येण्याची शक्यता रेल्वे सूत्रांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना व्यक्त केली आहे.


पुलाचं ९० टक्के काम पूर्ण!

मध्य रेल्वेवरील आंबिवली पुलाचं ९൦ टक्के पूर्ण झालं असून आता थोडंच काम शिल्लक असल्याचं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनिल उदासी यांनी सांगितलं आहे. त्यामुळे १८ तारखेलाच जर पुलाचं ९० टक्के काम पूर्ण झालं असेल, तर पूल वापरासाठी खुला करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत वाट पहायला लागण्याची शक्यता कमी आहे. याआधी एल्फिन्स्टन येथील पूल तयार झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत घोषणेआधीच प्रवाशांनी परस्पर पूल वापरायला सुरुवात केली होती.



९ मिनिटांत टाकला गर्डर

गुरुवारी या पुलाचे गर्डर टाकण्याचं काम पूर्ण करण्यात आलं आहे. त्यासाठी मध्य रेल्वेने गुरुवारी ५ तासांचा विशेष मेगाब्लॉकही घेतला होता. जवानांनी फक्त ९ मिनिटांत गर्डर टाकण्याचं काम पूर्ण केलं आणि जवळपास अर्ध्या तासात पूल उभा करण्यात आला. आंबिवली स्थानकात कसाऱ्याच्या दिशेला हा पूल बांधण्यात येत आहे.


३९ जवानांच्या मेहनतीचं फळ!

सकाळी १०.४५ च्या दरम्यान जवानांनी क्रेनच्या मदतीने पुलाचा गर्डर टाकला. दुपारी ३ वाजता कल्याण ते आसनगावदरम्यान रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली. आंबिवली स्थानकातील या पुलाच्या कामाला २० नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. ३९ जवान या पुलाचे काम करत आहेत. लष्कराला रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मदत करत आहेत. आंबिवली स्थानकातील पादचारी पुलाची लांबी १८.२९ मीटर, तर रुंदी ५ मीटर आहे. तसंच हा पूल २५ टन वजनाचा आहे.



हेही वाचा

बोरीवलीतील पादचारी पूल २० जानेवारीपासून प्रवाशांसाठी खुला

१५ दिवसांत तिन्ही पादचारी पुलांचं काम होईल? लष्करापुढे आव्हान


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा