Advertisement

'हे' स्थानक देशातील सर्वात स्वच्छ रेल्वे स्थानक!


'हे' स्थानक देशातील सर्वात स्वच्छ रेल्वे स्थानक!
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी स्थानक हे देशातील सर्वाच स्वच्छ स्थानक ठरलं आहे. रेल्वे मंत्रालयानं स्वच्छ रेल्वे स्थानकांचं वार्षिक सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणानुसार पश्चिम रेल्वे मार्गावर सगळ्यात स्वच्छ रेल्वे स्थानक होण्याचा मान अंधेरी रेल्वे स्थानकाला मिळाला असून, दुसऱ्या स्थानी विरार स्थानक आहे. अंधेरी आणि विरार या २ स्थानकांसह अन्य ६ उपनगरी रेल्वे स्थानकांना टॉप १० स्वच्छ स्थानकांमध्ये स्थान मिळालं आहे.

टॉप १० स्थानकं

रेल्वे मंत्रालयामार्फत 'स्वच्छ रेलस्वच्छ भारत २०१९सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणानुसार टॉप १० मध्ये मध्य रेल्वेची ३ स्थानकं आहेत. त्यामध्ये डोंबिवलीचा असून, देशभरातील एकूण ७२० रेल्वे स्थानकं आहेत. या सर्वेक्षणासाठी २५० जणांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं. यापैकी प्रत्येक स्थानकावर २ सर्वेक्षकांनी भेट दिली.

१०९ उपनगरी स्थानकं

पाहणी करण्यात आलेल्या ७२० रेल्वेस्थानकांपैकी १०९ उपनगरी स्थानकं होती. या सर्वेक्षकांनी सलग २ दिवस स्थानकांचं निरीक्षण केलं. कोलकाता मेट्रो ते चेन्नई स्थानकापर्यंत अनेक उपनगरी स्थानकांचं सर्वेक्षण करण्यात आलं. मात्र, मध्य रेल्वेचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर स्थानकांचा या सर्वेक्षणात समावेश करण्यात आला नव्हता.

A1 रेल्वेस्थानकं


A1 कॅटेगरी टर्मिनस स्टेशन म्हणजे ज्या स्थानकांमधील तिकिट विक्रीतून मिळणारा वार्षिक महसूल ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ज्यांची प्रवासी संख्या २० दशलक्षाहून अधिक आहे. अशा A1 स्थानकांमध्ये मध्य रेल्वेने चांगली कामगिरी केली आहे. A1 स्थानकांमध्ये मध्य रेल्वे मार्गावरील दादर दुसऱ्या तसंच, सीएसएमटी १४ व्या स्थानी आहे.



हेही वाचा -

आदित्य ठाकरेंनी उमेदवारी अर्ज भरला

राष्ट्रवादी काँग्रेसची २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा