Advertisement

मेट्रो लाईन-11 प्रकल्पाला मंजुरी

या लाईनचा 70 टक्के भाग हा भूमिगत असणार असून त्यात 13 भूमिगत आणि एक स्थानक जमिनीवर असणार आहे.

मेट्रो लाईन-11 प्रकल्पाला मंजुरी
SHARES

मुंबईतील (mumbai) आणिक (Anik) डेपो-वडाळा (wadala) ते गेटवे ऑफ इंडिया (Gateway of india) मेट्रो लाईन-11 प्रकल्प आणि त्यासाठी 23,487.51 कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली आहे.

मुंबई मेट्रो लाईन-11 हा मुंबई मेट्रो (Metro) लाईन-4 (वडाळा-ठाणे-कासरवडवली) चा विस्तार आहे. या लाईनचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ने तयार केला आहे.

हा प्रकल्प मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे बांधला जाईल. या लाईनचा 70 टक्के भाग हा भूमिगत असणार आहे. त्यात 13 भूमिगत आणि एक स्थानक जमिनीवर म्हणजेच भूपृष्ठाला समांतर असणार आहे.

या 17.51 किमी लांबीच्या प्रकल्पाला पायाभूत सुविधांवरील मंत्रिमंडळ उपसमितीने आधीच मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून 3,137.72 कोटी रुपयांची इक्विटी आणि 916.74 कोटी रुपयांची व्याजमुक्त दुय्यम कर्ज मदत मागितली जाईल.

बैठकीत प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. या मेट्रो मार्गिकेमुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक वेगवान आणि ट्राफिकमुक्त होणार आहे. तसेच प्रवाशांसाठी हा मेट्रो मार्ग महत्त्वाचा आणि सोयिस्कर ठरणार आहे.



हेही वाचा

संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेत 1,000 रुपयांची वाढ

136 किमीचे नवीन ट्रॅक बांधण्यास मान्यता

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा