Advertisement

नाईट कर्फ्युमुळे रिक्षा-टॅक्सी चालकांचा धंदा ठप्प

कोरोना प्रतिबंधासाठी जारी करण्यात आलेल्या नव्या निर्बंधांमुळं रिक्षा-टॅक्सीवर उदरनिर्वाह अवलंबून असलेले लाखो चालक-मालक अस्वस्थ झाले आहेत.

नाईट कर्फ्युमुळे रिक्षा-टॅक्सी चालकांचा धंदा ठप्प
SHARES

कोरोना प्रतिबंधासाठी जारी करण्यात आलेल्या नव्या निर्बंधांमुळं रिक्षा-टॅक्सीवर उदरनिर्वाह अवलंबून असलेले लाखो चालक-मालक अस्वस्थ झाले आहेत. पुन्हा लॉकडाऊन लावण्याच्या अफवेनं चालकवर्गातील अनेकांनी आधीच मुंबईला रामराम ठोकला असून, नव्या निर्बंधांमुळं दुसऱ्या पाळीतील व्यवसाय कोलमडल्यानं उर्वरित चालक मंडळी गावी जाण्याच्या तयारीत आहेत.

रिक्षा-टॅक्सी संघटनांच्या दाव्यानुसार अनेक चालक-मालक व्यवसाय बंद करून गावी निघून जात आहेत. लॉकडाऊनची अफवा त्यास कारणीभूत ठरत आहे. त्यासोबतच रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेतील नव्या निर्बंधांमुळे दुसऱ्या पाळीत बाहेर पडलेल्या चालकांना ग्राहक नसल्यानं रिकाम्या हाती घरी परतावे लागते. अनेक चालक बेरोजगार होत आहेत.

मुंबईत सुमारे ४८ हजार टॅक्सी तर ४ लाख रिक्षा आहेत. ही वाहने सकाळ आणि रात्र अशा २ पाळ्यांमध्ये रस्त्यावर धावत असतात. एका पाळीत मालक तर दुसऱ्या पाळीत चालक वाहन चालवतो. काही वाहने दोन्ही पाळ्यांमध्ये चालकांच्या हाती असतात. त्यामुळे जितकी वाहने तितके चालक या व्यवसायावर अवलंबून आहेत.



हेही वाचा -

  1. मुंबईत कोरोनाचा उद्रेक, गुरूवारी तब्बल 'इतके' नवे रुग्ण

  1. ठाणे जिल्ह्यात हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्यविक्री बंद


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा