Advertisement

बेस्ट कामगारांना संपावर जाण्यास औद्योगिक न्यायालयाची मनाई


बेस्ट कामगारांना संपावर जाण्यास औद्योगिक न्यायालयाची मनाई
SHARES

बेस्ट कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारच्या रात्रीपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार एकूण ३ हजार ५०० कर्मचारी संपावर जाणार आहेत. परंतु, बेस्ट कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यासाठी औद्योगिक न्यायालयानं मनाई केली आहे. मात्र संप करण्याच्या निर्णयावर अाम्ही ठाम अाहोत, असं बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी सांगितलं आहे.


बैठक निष्फळ

मध्यरात्री १२ वाजल्यानंतर कर्मचारी संपावर जाऊ नयेत यासाठी सोमवारी दुपारी बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी प्रशासन आणि युनियन यांच्यात बैठक बोलावली होती. संपाच्या इशाऱ्यावर चर्चा करण्यासाठी ही महत्त्वाची बैठक होती. मात्र, महाव्यवस्थापक या बैठकीला हजर राहिले नाहीत. महाव्यवस्थापक उपस्थित न आल्याने ही बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे आता बेस्टचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. 



हेही वाचा - 

रात्री १२ वाजल्यापासून ३० हजार ५०० बेस्ट कर्मचारी संपावर

मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक लोकल लवकरचं प्रवाशांच्या सेवेत




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा