Advertisement

रात्री १२ वाजल्यापासून ३० हजार ५०० बेस्ट कर्मचारी संपावर

शुक्रवारची बैठक निष्फळ ठरल्यानं संप निश्चित झाला. हा संप झाल्यास त्याचा मोठा फटका बेस्ट प्रशासनासह मुंबईकरांना बसणार असल्यानं महाव्यवस्थापकांनी शुक्रवारच्या निष्फळ बैठकीनंतर सोमवारी दुपारी पुन्हा बेस्ट कृती समितीला चर्चेसाठी बोलावलं होतं. सोमवारच्या बैठकीत तोडगा निघेल असं वाटत असताना अखेर ही बैठकही निष्फळ ठरली आहे.

रात्री १२ वाजल्यापासून ३० हजार ५०० बेस्ट कर्मचारी संपावर
SHARES

विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारच्या रात्रीपासून बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर सोमवारी दुपारी बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत तोडगा निघेल आणि संप टळेल, मुंबईकरांना दिलासा मिळेल असं वाटत होतं. पण ही बैठक अखेर निष्फळ ठरली. त्यामुळे आता काही तासांतच, रात्री १२ वाजल्यापासून बेस्टचे कर्मचारी संपावर जातील. त्यामुळे मंगळवारी सकाळी नोकरी-धंद्यासाठी, शाळा-काॅलेजसाठी निघालेल्या प्रवाशांना मोठे हाल सहन करावे लागणार आहेत. 




४ जानेवारीला शिक्कामोर्तब

२००७ मध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या २ वर्षांपासून रखडलेला वेतन करार मार्गी लावणे आणि बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अ अर्थसंकल्पात विलीन करणे या तीन महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी पंधरा दिवसांपूर्वीच बेस्ट कृती समितीने ७ जानेवारीच्या रात्रीपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर शुक्रवारी, ४ जानेवारीला बेस्ट कृती समिती आणि बेस्ट महाव्यवस्थापक यांच्यामध्ये बैठक पार पडली.

मात्र ही बैठक निष्फळ ठरल्यानं आक्रमक बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपावर शिक्कामोर्तब केलं. बेस्ट प्रशासन कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत गंभीर नसल्यानं ७ जानेवारीच्या रात्री १२ वाजल्यापासून ३० हजारांहून अधिक बेस्ट कर्मचारी संपावर जातील अशी प्रतिक्रिया बेस्ट कृती समितीचे निमंत्रक शशांक राव यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिली होती.


महाव्यवस्थापक अनुपस्थित

शुक्रवारची बैठक निष्फळ ठरल्यानं संप निश्चित झाला. हा संप झाल्यास त्याचा मोठा फटका बेस्ट प्रशासनासह मुंबईकरांना बसणार असल्यानं महाव्यवस्थापकांनी शुक्रवारच्या निष्फळ बैठकीनंतर सोमवारी दुपारी पुन्हा बेस्ट कृती समितीला चर्चेसाठी बोलावलं होतं. सोमवारच्या बैठकीत तोडगा निघेल असं वाटत असताना अखेर ही बैठकही निष्फळ  ठरली आहे. संपाच्या इशाऱ्यावर चर्चा करण्यासाठी ही महत्त्वाची बैठक असतानाही महाव्यवस्थापक या बैठकीला हजर राहिले नाहीत. त्यांच्या खालच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही बैठक घेतली. त्यामुळे महाव्यवस्थापक, बेस्ट प्रशासन किती गंभीर आहे हे पुन्हा समोर आल्याची प्रतिक्रिया शशांक राव यांनी दिली आहे. 


एकही बस धावणार नाही 

सरतेशेवटी बैठक निष्फळ ठरल्यानं आता आपल्या न्याय मागण्यांसाठी रात्री १२ वाजल्यापासून बेस्टचा कारभार ठप्प होईल, मुंबईच्या रस्त्यावरून एकही बेस्ट बस धावणार नाही असा इशारा बेस्ट कृती समितीनं दिला आहे. हा संप बेमुदत असल्यानं आता बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल होणार आहेत. त्यांना रेल्वे, टॅक्सी, रिक्षा, ओला-उबेरचा आधार आता घ्यावा लागणार आहे. 



हेही वाचा - 

ड्रायव्हिंग लायसन्सला आधार जोडणं बंधनकारक

दुसऱ्यांदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा