मुजोर रिक्षावाल्यांना चाप बसणार?

वांद्रे - येथे रिक्षावाल्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. प्रवाशांना कुठेही जायचं असल्यास मीटरवर भाडं न घेणं, शेअरिंगने प्रवासी नेताना पूर्ण भाडं घेणं, अमूक एखाद्या ठिकाणी जाण्याचं भाडंच नाकारणं असे प्रकार इथे सुरू आहेत. वांद्रे येथील वरिष्ठ वाहतूक पोलीस मच्छिंद्र बोडके यांनी या संदर्भात सांगितलं की, 20 ऑक्टोबरला 57 रिक्षाचालकांवर कारवाई केली होती. त्यात लायसन्स नसणाऱ्या, गणवेश न घालणाऱ्या आणि 3 पेक्षा अधिक प्रवासी घेणाऱ्या रिक्षाचालकांचा समावेश होता. आता शेअरिंग रिक्षासाठी वेगळी रांग करण्यात येईल. प्रवासाचा दरफलकही लावण्याच्या सूचना आम्ही रिक्षा संघटनेला दिल्या आहेत.

Loading Comments