Advertisement

बेस्ट वसाहतींमधील अस्वच्छतेमुळं रहिवाशांची गैरसोय, तातडीन पावलं उचलण्याचे आदेश

बेस्ट प्रशासनाकडं आपल्या कर्मचारी वसाहतींच्या स्वच्छतेसाठीही पैसे नसल्याचं चित्र दिसत आहे. वसाहतींची स्वच्छता होत नसल्यामुळं बेस्टच्या ३३ वसाहतींमधील कर्मचाऱ्यांची प्रचंड गैरसोय होत अाहे. त्यामुळं याबाबत बेस्ट समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

बेस्ट वसाहतींमधील अस्वच्छतेमुळं रहिवाशांची गैरसोय, तातडीन पावलं उचलण्याचे आदेश
SHARES

आर्थिक तोटा सहन करणाऱ्या बेस्ट प्रशासनाला कर्मचाऱ्यांना वेळेत पगार देणं कठीण होत आहे. करमचाऱ्यांना पगार वेळेत मिळत नसल्यामुळं त्यांच्या आर्थिक समस्यांमध्ये दिवसेदिवस वाढ होत आहे. अशातच आता, बेस्ट प्रशासनाकडं आपल्या कर्मचारी वसाहतींच्या स्वच्छतेसाठीही पैसे नसल्याचं चित्र दिसत आहे. वसाहतींची स्वच्छता होत नसल्यामुळं बेस्टच्या ३३ वसाहतींमधील कर्मचाऱ्यांची प्रचंड गैरसोय होत अाहे. त्यामुळं याबाबत बेस्ट समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर स्वच्छता आणि देखभालीच्या दृष्टीनं तातडीनं पावलं उचलावीत, असे निर्देश बेस्टचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांना दिले.


वसाहतींची अस्वच्छता

बेस्टच्या कर्मचारी व कल्याण विभागाकडून वसाहतींमधील साफसफाई कामांसाठी केलेल्या कराराच्या कार्योत्तर मंजुरीचा प्रस्ताव बेस्ट समितीपुढं बुधवारी मांडण्यात आला होता. त्यावेळी समितीच्या काही सदस्यांनी बेस्ट वसाहतींची झालेली अवस्था निदर्शनास आणली. यामध्ये बेस्ट वसाहतीच्या स्वच्छतेसाठी सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करून देखील वसाहतींची स्वच्छता न झाल्याची स्पष्ट झालं आहे. त्यामुळं बेस्ट वसाहतींचे दौरे करण्याची सूचना सदस्यांनी केली. त्याशिवाय, वसाहतीतील जुने पंप खराब झाल्यानं भविष्यात पाणी मिळणंही अवघड होईल, अशी चिंता सदस्यांनी व्यक्त केली.


साफसफाईचं काम ठेकेदाराकडं

याबाबत बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी आर्थिक स्थितीमुळं सफाईसाठी येणारा खर्च दर महिन्याला देण्यात येणार आहे. तसंच साफसफाईचं काम संस्थांकडून काढून घेऊन ते ठेकेदाराकडं देण्यात येणार असल्याचं म्हटलं. त्यामुळं बेस्टच्या वसाहतींमधील रहिवाशांची अस्वच्छतेमधुन मुक्तता होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



हेही वाचा -

मुंबईच्या या भागात २८,२९ एप्रिलला पाणीपुरवठा बंद

महिला मतदारांसाठी मतदान केंद्रावर सॅनेटरी पॅडची सुविधा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा