तिकीट दरवाढ अन् कर्मचारी कपातीचा प्रस्ताव, बेस्टचा अर्थसंकल्प सादर


SHARE

बेस्ट उपक्रमाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत सन २०१८-१९ चा ८८० कोटी ८८ लाखांचा अर्थसंकल्प बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्र बागडे यांनी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकिळ यांना सादर केला. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाला अजून मंजुरी दिलेली नसताना नवा अर्थ संकल्प कसा काय सादर करता? असा सवाल करत महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा आणि बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी या अर्थसंकल्पाला विरोध केला.

बेस्टची आर्थिक तूट भरून काढण्यासाठी या अर्थसंकल्पात तिकीट व बसपास दरात वाढ करण्याच्या शिफारसीसोबतच कर्मचारी कपातीचाही प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. शिवाय अर्थसंकल्पात कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, इतर भत्त्यांमध्ये कपात करण्याचे सूचवले आहे.


बोनससाठी महापौरांना करणार विनंती

महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला पाहिजे, अशी मागणी याआधी बेस्ट कृती समितीसोबत झालेल्या बैठकीत करण्यात आली होती. पण त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. बेस्टची आर्थिक परिस्थीती डबघाईला आलेली आहे. त्यात बोनस देण्याला व्यवस्थापकांनी मागेच स्पष्ट नकार दिलेला आहे. यासंदर्भात आता बेस्ट समिती महापौरांना विनंती करणार आहे.


अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

  • २०१८-१९ मध्ये भाडेतत्वावर एकूण ४०० बसगाड्या घेणार
  • २०० मिनी साध्या बस, तर २०० मिनी वातानुकलीत बस
  • अॅपआधारे बस आगारात खासगी बसगाड्यांसाठी पार्किंगची सुविधा
  • बेस्टची आर्थिक तूट भरुन काढण्याकरीता तिकीट दर वाढीचा प्रस्ताव
  • बेस्ट कर्मचाऱ्यांचे भत्ते होणार रद्द
  • बेस्ट कर्मचाऱ्यांचीही होणार कपात
  • चांगले उत्पन्न मिळणाऱ्या बसमार्गावर ज्यादाा बस चालवणार
  • अपंगांसाठी व्हीलचेयर वापरण्याच्या दृष्टीने बसगाड्या घेणारहेही वाचा -

बेस्ट आर्थिक तोट्यातून बाहेर येणार कधी?डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय