Advertisement

महाशिवरात्री निमित्त बेस्टच्या जादा बसगाड्या

बेस्ट उपक्रमातर्फे संजय गाधी राष्ट्रीय उद्यान ते कान्हेरी गुंफा आणि बाबुलनाथ दरम्यान जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाशिवरात्री निमित्त बेस्टच्या जादा बसगाड्या
SHARES

मुंबईतील कान्हेरी गुंफा येथील शंकराच्या मंदिरात आणि चर्नीरोड येथील बाबुलनाथ मंदिरात मोठ्या उत्साहात महाशिवरात्र साजरी केली जाते. मोठ्या भक्तीभावानं नागरिक शिवमंदिरात गर्दी करतात. अशावेळी या भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमातर्फे संजय गाधी राष्ट्रीय उद्यान ते कान्हेरी गुंफा आणि बाबुलनाथ दरम्यान जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


जादा बसगाड्या

बेस्ट उपक्रमातर्फे बसमार्ग क्रमांक १८८ मर्या. या मार्गावरील बोरिवरी रेल्वे स्थानक ते कान्हेरी गुंफा नियमित बससेवा सुरु ठेवण्यात येणार आहे. मात्र, संजय गाधी राष्ट्रीय उद्यान ते कान्हेरी गुंफा दरम्यान सकाळी ११.०० ते संध्याकाळी ७.०० वाजेपर्यंत एकूण ५ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसंच, बाबुलनाथ येथील शिवमंदीरात जाणाऱ्या प्रवाशांसाठी सकाळी ७.०० ते संध्याकाळी ७.०० वाजेपर्यंत बसमार्ग क्रमांक ५७, ६७ आणि १०३ या मार्गावर एकूण ६ जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.


वाहतूक अधिकाऱ्यांची नियुक्ती

त्याशिवाय या दोन्ही मार्गावराल गर्दीच्या ठिकाणी विशेषत: संजय गाधी राष्ट्रीय उद्यान प्रवेशद्वार, एलोरा चौकी आणि कान्हेरी गुंफा येथील प्रवाशांना आणि बाबुलनाथ मंदिर येथील प्रवशांना मार्गदर्शन करण्यासाठी बसनिरीक्षक तसंच वाहतूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.



हेही वाचा -

सीएसएमटी ते डोंबिवली धावणार १५ डब्यांची लोकल

अखेर मोनोच्या दुसऱ्या टप्प्याला मुहूर्त सापडला, रविवारी वडाळा -सातरस्ता मोनो सुरू

परळ टर्मिनसचे रविवारी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते लोकार्पण




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा