Advertisement

मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचारी संपावर, बेस्ट समितीच्या बैठकीत तोडगा नाही


मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचारी संपावर, बेस्ट समितीच्या बैठकीत तोडगा नाही
SHARES

बेस्टच्या खासगीकरणाविरोधात बेस्ट कर्मचारी कृती समितीने पुकारेल्या संपाबाबत बुधवारी दुपारी बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांच्याकडे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पण या बैठकीतून काहीही तोडगा न निघाल्याने संपाच्या निर्णयावर आपण ठाम असून बुधवारी मध्यरात्रीपासन बेस्ट कर्मचारी संपावर जातील, अशी माहिती बेस्ट कर्मचारी कृती समितीचे शशांक राव यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.


संपावर जाण्याची ठाम भूमिका

बेस्ट समितीच्या बैठकीत तोडगा निघाला नसला, तरी आता मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता हे काही तोडगा काढतात का? हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कारण बेस्ट समितीची बैठक निष्फळ ठरल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याची ठाम भूमिका घेतल्यानंतर तात्काळ आयुक्तांकडे बैठक लावण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वांचंच लक्ष या बैठकीकडे लागलं आहे.


पुन्हा आमनेसामने

मुंबईच्या विविध बेस्ट मार्गांवर भाडेतत्वावर ४५० खासगी मिनी बस चालवण्याच्या प्रस्ताव सोमवारी, १२ फेब्रुवारीला बेस्ट समितीनं परवानगी दिली आणि त्यानंतर बेस्टच्या खासगीकरणाच्या मुद्यावरून वाद सुरू झाला. बेस्ट कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाला कडाडून विरोध केल्यानं आता बेस्ट प्रशासन, महापालिका प्रशासन विरूद्ध बेस्ट कर्मचारी-संघटना असा सामना सुरू झाला आहे.


'खासगीकरणाचा निर्णय मागे घ्या'

दरम्यान खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात बेस्ट कर्मचारी कृती समितीनं गुरूवारी १५ फेब्रुवारीला संपाची हाक दिली आहे. या संपात ३२ हजार बेस्ट कर्मचारी सहभागी होणार आहेत.

हा संप रोखण्यासाठी बेस्ट समितीनं पुढाकार घेत बुधवारी ३ वाजता एक बैठक घेतली. कोकीळ यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांनी आपलं म्हणणं ठामपणे मांडत खासगीकरणाचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. पण शेवटी बैठक निष्फळ ठरली.



हेही वाचा-

बेस्ट कृती समितीने पुन्हा दिला संपाचा इशारा!



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा