Advertisement

सर्वसामान्यांसाठी 'लोकल'बाबत १५ डिसेंबरनंतर निर्णय घेऊ- महापालिका आयुक्त

'सर्वसमान्यांसाठी लोकल सुरु करण्याबाबतचा निर्णय हा १५ डिसेंबरनंतर घेऊ', असं मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी म्हटलं.

सर्वसामान्यांसाठी 'लोकल'बाबत १५ डिसेंबरनंतर निर्णय घेऊ- महापालिका आयुक्त
SHARES

मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा सर्वसमान्यांसाठी कधी सरू करणार? हा प्रश्न मागील अनेक दिवसांपासून सातत्यानं केला जात आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू व्हावी यासाठी प्रवासी संघटना वारंवार रेल्वे प्रशासनाला प्रश्न विचारत आहे. मात्र, या प्रश्नावर उत्तर देताना 'सर्वसमान्यांसाठी लोकल सुरु करण्याबाबतचा निर्णय हा १५ डिसेंबरनंतर घेऊ', असं मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी म्हटलं.

'मुंबईत सध्या दिवाळीनंतर कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळं सध्या आमचं याकडं लक्ष आहे. त्यामुळं मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय हा १५ डिसेंबरनंतर घेऊ. राज्य सरकारनं आपल्या राज्यात येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळं जर कोणाला मुंबई किंवा महाराष्ट्रात यायचं असेल, तर कोरोना चाचणीचा रिपोर्ट दाखवणं बंधनकारक असणार आहे. मुंबईत सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रवासी विमान आणि रेल्वे येत असतात. पालिका प्रशासन त्याची अंमलबजावणी करत आहे. त्यामुळं कोणालाही कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट नसेल, तर मुंबईत घेतलं जाणार नाही', असं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महापालिका आयुक्तांनी म्हटलं.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं मुंबईतील रेल्वेच्या स्टेशनवरही तपासणी सुरू केल्याचं त्यांनी म्हटलं. 'मुंबईत सध्या कोरोनाची स्थिती ही नियंत्रणात आहे. बेड योग्य प्रकारे उपलब्ध आहेत. कोरोनाची लाट येईल की नाही हे माहीत नाही. पण पालिकेनं याचे नियोजन सुरू केलं आहे. त्यामुळं आता लोकांनी जे नियम दिले ते पाळणं गरजेचं आहे. मुंबई मास्क न वापरणाऱ्यांविरोधात योग्य प्रकारे कारवाई होत आहे. पण तरीही काही लोक ऐकत नाही. त्यामुळं लोकांनी आता सुधारलं पाहिजे. याच पार्श्वभूमीवर आता मास्क कारवाईत जमलेल्या रकमेतून नागरिकांना पालिका मास्क विकत घेऊन वाटप करणार आहे', असंही इक्बालसिंग चहल म्हटलं.



हेही वाचा -

कोरोना रुग्ण संख्येत महाराष्ट्राचा क्रमांक घसरला


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा