Advertisement

राज्यात कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण राबविण्याला मंत्रिमंडळाची मान्यता

पर्यटन धोरणांतर्गत मुद्रांक शुल्कामध्ये सवलत, राज्य वस्तू व सेवा कराचा परतावा, विद्युत शुल्कामध्ये सवलत कॅरॅव्हॅन पार्क-कॅरॅव्हॅन पर्यटनासाठी लागू राहणार आहे.

राज्यात कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण राबविण्याला मंत्रिमंडळाची मान्यता
SHARES

कोरोनाच्या साथीनंतर सुरक्षित पर्यटनासाठी पर्यटक आता खासगी वाहनानं प्रवास करण्यास प्राधान्य देत असल्यानं राज्यात कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण राबविण्यास बुधवारी राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. पर्यटन धोरणांतर्गत मुद्रांक शुल्कामध्ये सवलत, राज्य वस्तू व सेवा कराचा परतावा, विद्युत शुल्कामध्ये सवलत कॅरॅव्हॅन पार्क-कॅरॅव्हॅन पर्यटनासाठी लागू राहणार आहे.

पर्यटन संचालनालयाकडे कॅरॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्कची नोंदणी आवश्यक राहणार आहे. कॅरॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्क व्यावसायिकांना पर्यटन संचालनालयामार्फत त्यांची प्रसिद्धी, स्वच्छता, व्यवस्थापन यांचे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या पर्यटन संकल्पनेमुळं पर्यटकांना राहण्याची सुविधा तसंच, खासगी गुंतवणुकीसही प्रोत्साहन मिळणार आहे.

कौटुंबिक सहलींचं आयोजन, हॉटेल्स आणि रिसॉर्ट या पारंपरिक निवास व्यवस्थेपेक्षा वेगळा अनुभव, ना विकास क्षेत्राचा योग्य वापर, दुर्गम भागातील पर्यटनाला चालना देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं शक्य होणार आहे. एमटीडीसीच्या पर्यटक निवासांच्या परिसरात किंवा त्यांच्या मोकळ्या जमिनीवर तसंच, कृषी पर्यटन केंद्रांच्या ठिकाणीदेखील कॅरॅव्हॅन पार्क करता येणार आहे.

कॅरॅव्हॅनमध्ये पलंग, स्वयंपाकघर, स्वच्छतागृह, बसण्याची व्यवस्था आदी विश्रांती आणि निवासाच्या दृष्टीनं त्याची बांधणी केली असेल. परिवहन आयुक्तांकडे या कॅरॅव्हॅनची नोंदणी करावी लागेल. कॅरॅव्हॅन पार्क व कॅराव्हॅन तसेच हायब्रिड कॅरॅव्हॅन पार्कची नोंदणी पर्यटन संचालनालयाकडे करावी लागेल. कॅरॅव्हॅन पर्यटन धोरणासंदर्भात राज्यस्तरीय समिती असून पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अध्यक्ष असतील.

तरतुदी काय?

  • कॅरॅव्हॅन पार्क योजनेत मूलभूत सोयीसुविधांनी युक्त अशा जागेवर कॅरॅव्हॅन पार्क उभी करून मुक्काम करता येईल.
  • यामध्ये लहानमोठय़ा आकाराच्या कॅरॅव्हॅन उभ्या करता येतील. असे पार्क खासगी किंवा शासकीय जमिनीवर स्वत: जमीनमालक किंवा विकासक उभारू शकतील.
  • वाहनतळाच्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा तसेच स्वतंत्र पाणी, रस्ते व वीजजोडणी असेल.
  • या ठिकाणी पर्यटक सुविधा केंद्र, उद्यानही असेल. कॅरॅव्हॅन पार्क मालकांनी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करायच्या आहेत.
  • या ठिकाणी पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहेदेखील असतील व विकलांगासाठी सुविधा असतील.
  • आवश्यक त्या परवानग्या स्थानिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जातील.



हेही वाचा -

महापौरांचा लोकल प्रवास, हात जोडून केली मास्क घालण्याची विनंती

मुंबईतील चार वॉर्ड पुन्हा हॉटस्पॉट होण्याच्या दिशेने


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा