Advertisement

महाशिवरात्री आणि होळीसाठी मध्य रेल्वेच्या १० विशेष गाडया

महाशिवरात्री आणि होळीनिमित्त मुंबईहून अनेक प्रवासी कोकणात जातात. त्यामुळं कोकण मार्गावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमते. प्रवाशांची होणारी ही गर्दी लक्षात घेत, मध्य रेल्वेनं कोकण मार्गावर दहा विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

महाशिवरात्री आणि होळीसाठी मध्य रेल्वेच्या १० विशेष गाडया
SHARES

महाशिवरात्री आणि होळीनिमित्त मुंबईहून अनेक प्रवासी कोकणात जातात. त्यामुळं कोकण मार्गावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमते. प्रवाशांची होणारी ही गर्दी लक्षात घेत, मध्य रेल्वेनं कोकण मार्गावर दहा विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमाळी, करमाळी ते पनवेल, पुणे ते सावंतवाडी रोड आणि पनवेल ते सावंतवाडी रोड या मार्गांवर या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. 


महाशिवरात्री विशेष गाड्या

०१११३ ही विशेष गाडी ४ मार्च रोजी रात्री १.१० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणार असून, त्याच दिवशी सावंतवाडी दुपारी १२ वाजता पोहचणार आहे. तसंच, ०१११४ – ही विशेष गाडी ४ मार्च रोजी सावंतवाडीहून दुपारी १.१० वाजता सुटणार असून, लोकमान्य टिळक टर्मिनसला रात्री १२.२० वाजता पोहचणार आहे. या दोन्ही गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ थांबा देण्यात येणार आहे.

 

सीएसएमटी – करमाळी

०११११ ही विशेष गाडी २ मार्च रोजी सीएसएमटीहून मध्यरात्री १२.२० वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी करमाळीला दुपारी १.३० वाजता पोहचणार आहे. ०१११२ – ही विशेष गाडी ३ मार्च रोजी करमाळीहून दुपारी २.०५ वाजता सुटणार असून, सीएसएमटीला मध्यरात्री १२.२५ वाजता पोहचणार आहे. या दोन्ही गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम या स्थानकांत थांबा देण्यात येईल


करमाळी - पनवेल

०१४३५ – ही विशेष गाडी १ मार्च रोजी पनवेलहून मध्यरात्री १.०० वाजता सुटणार असून, करमाळीला दुपारी १.३० वाजता पोहोचणार आहे. ०१४३६ – ही विशेष गाडी २ मार्च रोजी करमाळीहून दुपारी २.०५ वाजता सुटणार असून, त्याच दिवशी पनवेलला रात्री ११.२५ वाजता पोहचणार आहे. या दोन्ही गाड्यांना थीविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, रत्नागिरी, चिपळून, खेड, माणगावं आणि रोहा या स्थानकांवर थांबा देण्यात येईल.


होळी विशेष गाड्या

०१४७७ – ही विशेष गाडी १९ मार्च रोजी पुण्याहून संध्याकाळी ६.४५ वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी  सावंतवाडी रोडला सकाळी ८.०० वाजता पोहोचणार आहे. ०१४७८ – ही विशेष गाडी २१ मार्च रोजी सावंतवाडी रोडहून दुपारी १.१० वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी मध्यरात्री पुण्याला मध्यरात्री २.४५ वाजता पोहचणार आहे. या दोन्ही गाड्यांना लोणावळा, पनवेल, रोहा, माणगावं, खेड, चिपळून, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबा देण्यात येईल.


सावंतवाडी रोड – पनवेल

०११२१ ही विशेष गाडी २० मार्च रोजी सावंतवाडी रोडहून दुपारी १.१० वाजता सुटणार असून,  सावंतवाडी रोडला रात्री ११.०० वाजता पोहोचणार आहे. ०११२२ ही विशेष गाडी २० मार्च रोजी पनवेलहून रात्री ११.२५ वाजता सुटणार असून, सावंतवाडी रोडला दुसऱ्या दिवशी सकाळी ९.४५ वाजता पोहचणार आहे. या दोन्ही गाड्यांना कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, रत्नागिरी, चिपळून, खेड, माणगावं आणि रोहा या स्थानकांवर थांबा देण्यात येईल.



हेही वाचा -

१९ वर्षांनी सलमान-भन्साळींचं 'रियुनियन'

'विमान हायजॅक'च्या धमकीमुळे विमानतळावरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा