Advertisement

मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी 'असा' असेल मेगाब्लॉक

देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार, २५ एप्रिल राेजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी 'असा' असेल मेगाब्लॉक
(Representational Image)
SHARES

मुंबई रेल्वे मार्गावरील विविध ठिकाणांवरील देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार, २५ एप्रिल राेजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) व विद्याविहार दरम्यान रविवारी सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक असेल. सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३६ पर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या धिम्या फेऱ्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल मशीद बंदर, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करीरोड आणि विद्याविहार या स्थानकांवर थांबणार नाहीत. त्यानंतर या लोकल गाड्या पुन्हा नियोजित मार्गावर वळविण्यात येतील.

हेही वाचा- ब्रेक द चेन: सर्वसामान्यांचा प्रवास पुन्हा थांबला!

घाटकोपर येथून सकाळी १०.४० ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार व सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. त्या विद्याविहार, करीरोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड आणि मशीद बंदर या स्थानकांवर थांबणार नाहीत. या कालावधीत अप व डाऊन धिम्या मार्गावरील लोकल मशीद बंंदर, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करीरोड आणि विद्याविहार या स्थानकांवर थांबणार नाहीत.

हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला - वाशी अप व डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान मेगाब्लॉक असेल. सीएसएमटीहून रविवारी सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ पर्यंत वाशी, बेलापूर, पनवेल आणि पनवेल, बेलापूर, वाशी इथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ या वेळेत सीएसएमटीसाठी एकही लोकल धावणार नाही. मेगाब्लॉकच्या वेळेत सीएसएमटी आणि कुर्लादरम्यान तसंच पनवेल आणि वाशीदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील.

हेही वाचा- बनावट ओळखपत्रावर अनेकांचा लोकल प्रवास; रेल्वे पोलिसांकडून धरपकड

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा