Advertisement

टिटवाळा स्टेशनवर प्रवाशांचा रेलरोको, मध्य रेल्वे उशीराने

टिटवाळा स्थानकात प्रवाशांनी रुळावर उतरत रेल्वे १५ मिनिटे रोखून धरली.

टिटवाळा स्टेशनवर प्रवाशांचा रेलरोको, मध्य रेल्वे उशीराने
SHARES

कसारा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) लोकल ट्रेनची सेवा बुधवार, 16 नोव्हेंबर रोजी विस्कळीत झाली आहे. टिटवाळा स्थानकावर अनेक प्रवाशांनी रेलरोको आंदोलन केल्याने रेल्वे सेवा प्रभावित झाली.

टिटवाळा येथे सकाळी 8.18 वाजता लोकल पोहोचणार होती मात्र ती 10 मिनिटांनी 8.30 वाजता पोहोचल्याने प्रवाशांचे हाल झाले. त्यांनी आरोप केला की, ट्रेनच्या कामकाजाला होणारा विलंब हा वारंवार घडत होता आणि त्यातील काही प्रवाशांनी ट्रॅकवर उडी मारली आणि ट्रेनला पुढे जाण्यापासून रोखले.

"कसारा ते सीएसएमटी लोकल काही तांत्रिक कारणामुळे सकाळी 8.30 वाजता (शेड्युल 8.18 वाजता) टिटवाळ्याला आली. लोकांनी नाराज होऊन ट्रेनला जाऊ दिले नाही. रेल्वे कर्मचार्‍यांशी चर्चा केल्यानंतर, ट्रेन टिटवाळ्याहून सकाळी 8.51 वाजता निघाली," असं मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 

अधिकाऱ्याने विनंती केली की, रेलरोको करून सेवा खंडित करणे हा तुमच्या समस्या ऐकण्याचा योग्य मार्ग नाही. कारण त्यामुळे इतर प्रवाशांना त्रास होतो. ते म्हणाले की, गाड्यांना वारंवार उशीर होण्याचे कारण अधिकारी शोधून काढतील.



 हेही वाचा

19 आणि 20 नोव्हेंबरला मध्य रेल्वेकडून ब्लॉक, रद्द झालेल्या 36 एक्स्प्रेसची यादी एका क्लिकवर

मध्य रेल्वेचा २७ तासांचा जम्बो ब्लॉक, 'या' स्थानकांदरम्यान लोकल सेवा बंद

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा