Advertisement

नाशिककरांची 'दिल्ली'वारी सुकर! लवकरच मध्य रेल्वेवर रोज धावणार राजधानी एक्सप्रेस


नाशिककरांची 'दिल्ली'वारी सुकर! लवकरच मध्य रेल्वेवर रोज धावणार राजधानी एक्सप्रेस
SHARES

नाशिक-धुळे-जळगाववासियांची 'दिल्ली'वारी सोपी आणि सुकर व्हावी यासाठी रेल्वे प्रशासनानं मध्य रेल्वेवरून राजधानी एक्सप्रेस सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार १९ जानेवारीला मध्य रेल्वेवरून पहिली राजधानी एक्सप्रेस धावली असून या राजधानी एक्स्प्रेसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद लक्षात घेता रेल्वेनं आठवड्यात दोन दिवस मुंबईतून तर दोन दिवस दिल्लीतून सुटणारी राजधानी आता दररोज सोडण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. खुद्द रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेत राजधानीच्या फेऱ्या वाढव्या अशा सुचना मध्य रेल्वेला केल्या होत्या. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असून आता मध्य रेल्वेवर दररोज राजधानी धावणार असल्यानं नाशिक-धुळे-जळगाववालियांना मोठा दिलासा मिळणार आहे.


२१ डबे मध्य रेल्वेला देण्याची मागणी

मध्य रेल्वेवर दररोज राजधानी एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी मध्य रेल्वे आता कामाला लागलं आहे. त्यानुसार चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीला (आयसीएफ) मुंबई-दिल्ली राजधानीच्या रेकसाठी एकूण २१ डबे मध्य रेल्वेला देण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये ३ टायर एसीचे १० डबे, २ टायर एसीचे ६ डबे, ३ जनरेटर आणि २ पँट्री डबे यांचा समावेश आहे. दरम्यान, आयसीएफमधून हे डबे दोन टप्प्यांमध्ये मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. तर रेक मुंबईत दाखल झाल्यानंतर दररोज मध्य रेल्वेवरून राजधानी धावणार आहे.


राजधानीच्या रेकची बांधणी मुंबईत

चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीतून मुबई-दिल्ली राजधानी एक्सप्रेसचे डबे मुंबईत दाखल झाल्यानंतर राजधानीच्या रेकची बांधणी करण्यात येणार आहे. सध्या राजधानी एक्सप्रेस १६ डब्यांसह धावत आहे. त्याचप्रमाणं प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता २६ जानेवारीपासून राजधानीला एसी ३ टायरचा अतिरिक्त डबा जोडण्यात आला आहे.



हेही वाचा -

डिजीटल बुकिंगसाठी शनिवार-रविवार तिकीट काऊंटर बंद

मराठा कुणबीच! मराठा स्वतंत्र जात नाही-राज्य मागास वर्ग आयोग



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा