Advertisement

पश्चिम रेल्वे प्रवाशांना शनिवार-रविवारी आता डिजिटल तिकीटाचाच पर्याय


पश्चिम रेल्वे प्रवाशांना शनिवार-रविवारी आता डिजिटल तिकीटाचाच पर्याय
SHARES

रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्यांसमोरील रांगा कमी करण्यासाठी तसंच कागदाचा वापर कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं डिजिटल तिकीट सेवा उपलब्ध करून दिली आहे. तर या सेवेमुळे रांगेत ताटकळत उभं राहवं लागत नसल्यानं या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हीच बाब लक्षात घेत आता आणखी प्रवाशी डिजिटल सेवेकडे वळावेत यासाठी रेल्वेनं प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून पश्चिम रेल्वेनं एक आगळीवेगळी शक्कल शोधून काढली आहे. ती म्हणजे शनिवार-रविवार चक्क पश्चिम रेल्वे मार्गातील चर्चगेट, प्रभादेवी, दादर, वांद्रे, कांदिवली आणि बोरीवली रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडक्याच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून प्रवाशाला डिजिटल तिकीटाशिवाय पर्यायच उरणार नाही. त्यामुळे प्रवाशांनो यापुढं शनिवार-रविवार तुम्हाला डिजिटल तिकीटच काढावं लागणार हे नक्की.


यूटीएस अॅप डाऊनलोड करणं गरजेच

डिजिटल तिकीटासाठी रेल्वेनं यूटीएस मोबाईल अॅप तयार केला आहे. या अॅपद्वारे लोकलचं आॅनलाईन तिकीट काढता येतं. मात्र त्याचसाठी प्रवाशांकडे स्मार्टफोन असणं आणि त्यात यूटीएस अॅप डाऊनलोड करणं गरजेचं आहे. या यूटीएस अॅपला आणि डिजिटल तिकीट काढणं सोपं झालं असून डिजिटल सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुळात रांगामधून प्रवाशांची सुटका होत असल्यानं तसंच रेल्वे कर्मचार्यांवरील कामाचा ताण कमी होत असल्यानं अधिकाधिक प्रवाशांनी डिजिटल तिकीटाकडे वळावेत असा पश्चिम रेल्वेचा प्रयत्न आहे.


डिजिटल तिकीट सेवा

त्यातूनच डिजिटल तिकीट सेवा अधिकाधिक प्रवाशांपर्यंत पोहचावी आणि प्रवाशांनी हे अॅप आपलंसं करावं यासाठी शनिवार-रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावरील काही स्थानकातील तिकीट खिडक्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चर्चगेट, प्रभादेवी, वांद्रे, अंधेरी, कांदिवली, बोरीवली या रेल्वे स्थानकावरील खिडक्या बंद राहणार आहेत. रेल्वे कर्मचारी एटीव्हीएम मशिनजवळ उभं राहून प्रवाशांना डिजिटल तिकीट काढण्यासाठी मदत करण्यासह प्रोत्साहित करणार आहेत. तर डिजिटल तिकीट सेवेबाबत जनजागृतीही यावेळी करण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी नेमकी कधी करणार, अर्थात चर्चगेट, प्रभादेवी, वांद्रे, अंधेरी, कांदिवली आणि बोरीवलीमधील तिकीट खिडक्या कोणत्या तारखेला बंद राहणार हे अद्याप पश्चिम रेल्वेनं सांगितलेलं आहे. असं असलं तरी लवकरच याची अंमलबजावणी होण्याची शक्यता असून हा प्रयोग तीन आठवड्यांसाठी असणार आहे. म्हणजेच तीन आठवड्यातील शनिवार-रविवार तिकीट खिडक्या बंद राहणार असून प्रवाशांना डिजिटल तिकीट उपलब्ध करून दिलं जाणार आहे.



हेही वाचा

आता रेल्वे रूळांची साफसफाई करणार 'मक स्पेशल लोकल'

पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात ६ सेगवे वाहने दाखल


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा