Advertisement

रेल्वेच्या 'या' मार्गावरील धातूशोधक दरवाजे काढण्याचा निर्णय


रेल्वेच्या 'या' मार्गावरील धातूशोधक दरवाजे काढण्याचा निर्णय
SHARES

मध्य रेल्वेवरील ज्या स्थानकातून मेल-एक्स्प्रेस गाड्या आणि लोकल गाड्या सुटतात किंवा थांबा असलेल्या स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी होते, बाहेरगावी जाण्यासाठी प्रवासी तेथे सामानासह पोहोचतात, त्या गर्दीच्या ठिकाणी घातपाताचाही धोका संभवतो. त्यामुळे मुंबई उपनगरीय स्थानकातील काही गर्दीच्या स्थानकात प्रवेशद्वारांजवळच डोअर मेटल डिटेक्टर बसवण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध स्थानकांत बसविलेले ३० धातूशोधक दरवाजे (डोअर मेटल डिटेक्टर) चालत नसून निकामी ठरलेले हे मेटल डिटेक्टर तेथून हटविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

या ठिकाणी आता हॅण्डहेल्ड मेटल डिटेक्टर घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. या स्थानकांमध्ये सीएसएमटी, दादर, कु र्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल याशिवाय अन्य काही स्थानकात मेटल डिटेक्टर आहेत. एखादे शस्त्र घेऊन गेल्यास डोअर मेटल डिटेक्टरवर तात्काळ धोक्याची सूचना देणारा अलार्म वाजतो. परंतु मध्य रेल्वे स्थानकातील डोअर मेटल डिटेक्टर नेहमीच बंद असल्याचे निदर्शनास आले. त्याचा वापरही होत नसल्याने टीका झाली.

या मेटल डिटेक्टरजवळ एखादा सुरक्षा कर्मचारी तैनात करणं गरजेचं असतानाही त्याकडे सुरक्षा दलाकडून दुर्लक्षच केलं जातं. सीएसएमटी स्थानकात २६/११ चा हल्ला झाल्यानंतर बंदच असलेल्या डोअर मेटल डिटेक्टरवरही बरीच टीका झाली होती.

यानंतर रेल्वे प्रशासनाकडून त्याचा आढावा घेतला जात आहे. उपनगरीय स्थानक व टर्मिनसवरील एकूण ३० मेटल डिटेक्टर बिनकामी झाले असल्यानं ते तेथून हटविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्याऐवजी सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी हॅण्डहेल्ड मेटल डिटेक्टर घेण्यात येणार आहेत. शिवाय एकात्मिक सुरक्षा प्रणालीअंतर्गत नवीन सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात येणार आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा