Advertisement

ठाणे : घोडबंदर रोडवर मेट्रोच्या कामामुळे वाहतूक मार्गात बदल

घोडबंदर मार्गावर घाटकोपर ते गायमुख या मेट्रो 4 मार्गाचे बांधकाम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) केले जात आहे.

ठाणे : घोडबंदर रोडवर मेट्रोच्या कामामुळे वाहतूक मार्गात बदल
SHARES

घोडबंदर मार्गावरील नागला बंदर परिसरात मेट्रो मार्गाच्या खांबावर बीम बसविण्यात आल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर ठाणे वाहतूक पोलिसांनी 23 मार्चपर्यंत या मार्गावरून जाण्यासाठी बुधवारी मध्यरात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

तर हलकी वाहने नागला बंदर येथील सर्व्हिस रोडवरून प्रवास सुरू ठेवतील. या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक कशेळी-काल्हेर व अंजूरफाटा या पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार असून त्यामुळे या पर्यायी मार्गांवर कोंडी होण्याची शक्यता आहे.

मेर्टोच्या कामामुळे मार्गात बदल

घोडबंदर मार्गावर घाटकोपर ते गायमुख या मेट्रो 4 मार्गाचे बांधकाम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) केले जात आहे. या मार्गावरील नागला बंदर परिसरातील मेट्रोच्या खांबावर बीम बसविण्याचे काम बुधवारी (१५ मार्च) रात्रीपासून हाती घेण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळी बीम बसविण्याचे काम होणार असल्याने त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ शकते. ही कोंडी टाळण्यासाठी ठाणे पोलिसांनी वाहतूक मार्गात मोठे बदल राबवले आहेत.

हे बदल बुधवार 15 मार्च, मध्यरात्री ते गुरुवार, 23 मार्चपर्यंत दररोज पहाटे 4:00 वाजेपर्यंत लागू असतील. या बदलामुळे घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असून ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.

हे वाहतूक बदल आहेत

प्रवेश बंद

मुंबई-नाशिक महामार्गावरील घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना कापूरबावडी चौकात प्रवेश बंद करण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग

ही वाहने माजिवडा पुलावरून खारेगाव टोल नाका, माणकोली, अंजूरफाटा किंवा कापूरबावडी जंक्शनमार्गे बाळकुम, कशेळी, अंजूरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद

मुंब्रा, कळवा येथून घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना खारेगाव टोल प्लाझावर प्रवेश बंद करण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग

ही वाहने खारेगाव खडी पूल, खारेगाव टोल नाका, माणकोली, अंजूरफाटा मार्गे गॅमन मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद

नाशिकहून घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना माणकोली नाक्यावर प्रवेश बंद करण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग

ही वाहने माणकोली पुलाखालून अंजूरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. नागला बंदर सेवा रस्त्यापासून घोडबंदरकडे हलकी वाहने जातील.हेही वाचा

Mumbai Metro : बीकेसी ते सीप्झ मेट्रो 3 डिसेंबर 2023 पर्यंत सुरू होऊ शकते

मालाड आगीत दहावीच्या विद्यार्थ्यांची पुस्तके, हॉल तिकीटही जळाली

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा